Authored by विजयसिंह होलम | Edited by रोहित धामणस्कर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: Jul 21, 2022, 11:11 AM
Maharashtra politics | नगरसेवक अनिल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नगर शहरातील आजी-माजी नागरसेवकांसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. यामध्ये शिवसेनेचे दक्षिण जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांचे पुत्र नगरसेवक योगीराज गाडे आणि शशिकांत गाडे यांचे बंधू रमाकांत गाडे यांचा यामध्ये समावेश आहे. दोन दिवसांपूर्वी गाडे आणि नगर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांच्या उपस्थितीत नगर शहरात नगरसेवक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची एक बैठक घेण्यात आली होती.

हायलाइट्स:
- नगरमध्येही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसशी जवळीक मान्य नाही
- जे राज्यात ते नगरलाही घडलं.
- २४ पैकी फक्त दहा नगरसेवक या बैठकीला उपस्थित
नगरसेवक अनिल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नगर शहरातील आजी-माजी नागरसेवकांसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. यामध्ये शिवसेनेचे दक्षिण जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांचे पुत्र नगरसेवक योगीराज गाडे आणि शशिकांत गाडे यांचे बंधू रमाकांत गाडे यांचा यामध्ये समावेश आहे. दोन दिवसांपूर्वी गाडे आणि नगर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांच्या उपस्थितीत नगर शहरात नगरसेवक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची एक बैठक घेण्यात आली होती. यामध्ये सर्वांनी ठाकरे यांच्या सोबत असल्याची ग्वाही दिली होती. मात्र अनेकांनी कोरगावकर यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. २४ पैकी फक्त दहा नगरसेवक या बैठकीला उपस्थित होते. तरीही सर्वजण आमच्यासोबत असल्याचा दावा कोरगावकर यांनी केला होता. प्रत्यक्षात मात्र येतील अनेकांचा ओढा शिंदे गटाकडे असल्याचे यातून स्पष्ट होत आहे.
मुख्य म्हणजे नगरमध्येही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसशी जवळीक मान्य नाही. यासंबंधी पूर्वीपासूनच तक्रारी आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असतानाही नगर शहरात मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकीय वैर कायम होते. आता सरकार गेल्यानंतर आणि शिंदे गट वेगळा झाल्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना खदखद व्यक्त करण्यासाठी संधी मिळाली आहे. याच कारणावरून नगरचे माजी आमदार (स्व.) अनिल राठोड यांचे चिरंजीव व युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष माजी नगरसेवक विक्रम राठोड हेही शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा आहे. यासंबंधी त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तसे संकेत दिल्याचे सांगण्यात येते. तर दुसरीकडे नगरमधील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या काही पदाधिकारी, कार्यकर्त्यांनीही मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतल्याने त्याबद्दलही तर्कवितर्क लढवले जात आहेत.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Web Title : major setback for shiv sena uddhav thackeray in ahmednagar district joins eknath shinde camp
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network