नवी दिल्ली : एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत सुरू असलेल्या संघर्ष दिवसेंदिवस आणखीनच टोकदार होत चालला आहे. आमदारांनी बंड केल्यानंतर लोकसभेतील शिवसेनेच्या १८ पैकी १२ खासदारांनीही वेगळा गट स्थापन करण्याच्या निर्णय घेतला. त्यानंतर लोकसभा अध्यक्ष यांनी या गटाला आणि शिवसेनेचे नवे गटनेते म्हणून राहुल शेवाळे यांच्या निवडीला मान्यता दिली. या मुद्द्यावरून आता शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेत थेट सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचं जाहीर केलं आहे.

शिवसेनेचे खासदार यांनी पत्रकार परिषद घेत लोकसभा सचिवालयावर गंभीर आरोप केले. ‘शिंदे गटाने १९ जुलै रोजी नव्या गटनेतेपदाबाबत पत्र दिलेलं असताना लोकसभा सचिवालयाने १८ जुलैपासूनच या निर्णयाची अंमलबजावणी होत असल्याचं सांगितलं. हा निर्णय कशाचा आधारे घेण्यात आलेला आहे? त्यामुळे लोकसभा अध्यक्षांच्या या निर्णयाला आम्ही सुप्रीम कोर्टात आव्हान देऊ,’ असं खासदार राऊत यांनी सांगितलं आहे.

‘लोकसभेतील गटनेता निवडीचा अधिकार हा पक्षप्रमुखांना असतो. शिवसेनेचे पक्षप्रमुख आजतरी हेच आहेत आणि उद्याही तेच राहतील. मात्र असं असताना शिंदे गटाकडून चुकीच्या पद्धतीने गटनेतेपदावर दावा करण्यात आला आहे,’ असा हल्लाबोल विनायक राऊत यांनी केला आहे. तसंच आम्ही लोकसभा अध्यक्षांना आधीच एक पत्र देत कोणी गटनेतेपदाबाबत दावा केल्यास आमची बाजू ऐकून घेतल्याशिवाय निर्णय देऊ नये, असं पत्र दिलेलं होतं. या पत्राचीही लोकसभा अध्यक्षांनी दखल घेतली नसल्याचा आरोपही विनायक राऊत यांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here