हावडा : सध्या लोक सहज दारू पार्ट्या करत असतात. पण याच दारूमुळे एका क्षणात सात जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तुम्हीही जर सहज दुकानातून दारू घेऊन पित असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बनावट दारू प्यायल्याने सहा जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण आजारी पडले. एका पोलीस अधिकाऱ्याने बुधवारी यासंबंधी माहिती दिली आहे. सात जणांच्या मृत्यूच्या आरोपाखाली पोलिसांनी दारू दुकानाचा मालक प्रताप कर्माकर याला अटक केली आहे. पश्चिम बंगालच्या हावडा जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इथं मंगळवारी रात्री देशी दारूचे सेवन केल्याने अनेक लोक आजारी पडले, असे अधिकाऱ्याने सांगितले.

प्रियकराला अश्लील कॉल करताना पतीने रंगेहात पकडलं, जुगारी पत्नीने एकदोन नाही तर तब्बल २८ वेळा..
“आजारी पडलेल्यांपैकी बहुतेकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यापैकी सात जणांचा आज सकाळी मृत्यू झाला,” अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. दरम्यान, मृत्यूचं कारण कळण्यासाठी पोलीस पोस्टमॉर्टम रिपोर्टची वाट पाहत असून आम्ही दुकान मालकाला अटक केली असल्याचं सांगण्यात आलं आहे. तर दारूचे काही नमुने चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

दरम्यान, आजारी पडलेल्या काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने दुकान सील केले आहे. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांकडून निषेध होत असून लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

Maharashtra Weather Alert: राज्यात पुढचे ४-५ दिवस मुसळधार पाऊस, हवामान खात्याकडून ‘या’ भागांना इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here