Cloud Adoption: ‘फ्यूचर ऑफ क्लाउड अँड इट्स इकॉनॉमिक इम्पॅक्ट: अपॉर्च्युनिटी फॉर इंडिया’ या शीर्षकाच्या अहवालानुसार, सर्वांगीण प्रयत्नांमुळे पुढील पाच वर्षांत क्लाउडच्या खर्चात २५-३० टक्के वाढ होऊ शकते. क्लाउडचा मोठ्या प्रमाणावर अवलंब केल्याने देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनात (जीडीपी) ३८० डॉलर अब्ज योगदान देण्याची क्षमता आहे.

 

Cloud System GDP
क्लाऊड प्रणालीमुळे वाढणार जीडीपी
नवी दिल्ली : वैयक्तिक माहिती साठवून ठेवणे, ई-मेलचा साठा करणे, साठवलेली माहिती केव्हाही पाहणे या आणि अशा अनेक कामांसाठी देशात आता क्लाऊडना पसंती मिळू लागली आहे. गुगल, सॅमसंग या कंपन्या क्लाऊड सेवा पुरवत आहेत. त्याचप्रमाणे अनेक कंपन्याही आपल्या कर्मचाऱ्यांना स्वतःची क्लाऊड सेवा देत आहेत. क्लाऊडवर माहिती साठवून स्वतःच्या संगणकाची मेमरी मोकळी ठेवण्याकडे कल वाढू लागला आहे. अशा प्रकारे क्लाऊड प्रणाली मोठ्या प्रमाणावर स्वीकारली जात असल्याने २०२६पर्यंत देशाच्या जीडीपीमध्ये ३८० अब्ज डॉलरची भर पडेल, असा विश्वास नॅसकॉम या आयटी कंपन्यांच्या मध्यवर्ती संघटनेने व्यक्त केला आहे. क्लाऊडमुळे याच्याशी संबंधित असे प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष १.४० कोटी रोजगारही निर्माण होतील, असा दावा नॅसकॉमने केला आहे.

…म्हणून ठरतेय महत्त्वाचे

  • क्लाऊडचा स्वीकार करण्याची मानसिकता वाढली नाही तर २०२६पर्यंत देशात पाच कोटी रोजगार जाण्याची भीती.
  • क्लाऊड प्रणालीकडे दुर्लक्ष केल्यास २०२६पर्यंत जीडीपीचे ११८ अब्ज डॉलरचे नुकसान होण्याची शक्यता.
  • क्लाऊडचा स्वीकार न केल्यास भारतीय कंपन्यांकडे गुंतवणूकदारांचा कल कमी होण्याचाही धोका.

भवितव्य उज्ज्वल

  • ‘फ्युचर ऑफ क्लाऊड अॅण्ड इट्स इकॉनॉमिक इम्पॅक्ट ः अपॉर्च्युनिटी फॉर इंडिया’ या अहवालात पुढील पाच वर्षांत क्लाऊडसाठी केल्या जाणाऱ्या खर्चात २५ ते ३० टक्के वाढ अपेक्षित आहे.
  • भारतीय क्लाऊड बाजारपेठेने दरवर्षी ४४ टक्के दराने वाढ नोंदवली आहे.
  • जागतिक क्लाऊड बाजारपेठेला भारतीय क्लाऊड बाजारपेठेने मागे टाकले आहे.
  • डिजिटल लोकसंख्यावाढ, गुंतवणुकीतील वाढ, कंपन्यांचे डिजिटायझेशन आणि अनुकूल सरकारी धोरणे यामुळे देशातील क्लाऊड विढीला चालना मिळत आहे.
  • नागरी सेवा देणे सुलभ होईल तसेच आरोग्यनिगा, वित्तसेवा, सर्वांसाठी शिक्षण या सर्व सुविधा सुलभरीत्या देणे शक्य होईल.– Agency

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : large-scale cloud adoption can contribute $380 billion to india’s gdp by 2026 nasscom
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here