BJP Chitra Wagh | महाराष्ट्रातील राजकारणाची पातळी खालवली असून माझी वैयक्तिक बदनामी करण्यासाठी ‘तो’ व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करण्यात आला. यावर आमची कायदेशीर टीम तपासणी करत असून गरज पडल्यास न्यायालयातही जाण्याची आमची तयारी आहे, असे नाना पटोले यांनी सांगितले. त्यामुळे आता यावर चित्रा वाघ काय भूमिका घेतात, ते पाहावे लागेल.

 

हायलाइट्स:

  • वाघ यांनी पत्रकारपरिषद घेत या सगळ्या वादाला आणखीनच हवा दिली होती
  • वाघ यांना न्यायालयात खेचण्याची तयारी
  • महाराष्ट्रातील राजकारणाची पातळी खालवली
मुंबई: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा एका महिलेसोबतचा व्हिडिओ सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी हा व्हिडिओ ट्विट करत या सगळ्या चर्चेला तोंड फोडले होते. एवढेच नव्हे तर नाना पटोले (Nana Patole) यांनी त्यावर कोणतेही उत्तर न दिल्याने चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी बुधवारी पत्रकारपरिषद घेत या सगळ्या वादाला आणखीनच हवा दिली होती. त्यानंतर नाना पटोले हे चित्रा वाघ यांच्याविरुद्ध आक्रमक झाले आहेत. नाना पटोले यांनी चित्रा वाघ यांच्या आरोपांना जाहीरपणे प्रत्युत्तर दिले नसले तरी त्यांनी वाघ यांना न्यायालयात खेचण्याची तयारी सुरु केली आहे.

नाना पटोले यांनी नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना याबाबत माहिती दिली. महाराष्ट्रातील राजकारणाची पातळी खालवली असून माझी वैयक्तिक बदनामी करण्यासाठी ‘तो’ व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करण्यात आला. यावर आमची कायदेशीर टीम तपासणी करत असून गरज पडल्यास न्यायालयातही जाण्याची आमची तयारी आहे, असे नाना पटोले यांनी सांगितले. त्यामुळे आता यावर चित्रा वाघ काय भूमिका घेतात, ते पाहावे लागेल.
चित्राताई, आधी ‘हे’ कार्यक्रम बंद करा, काँग्रेसच्या महिला नेत्याचा सल्ला
चित्रा वाघ यांनी आतापर्यंत माजी मंत्री संजय राठोड, शिवसेना नेते रघुनाथ कुचीक, राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे, मेहबूब शेख यासारख्या नेत्यांवर आरोप करत चित्रा वाघ यांनी खळबळ उडवून दिली होती. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी कालच्या पत्रकारपरिषदेत त्यांना “तुमच्याकडेच असे व्हिडिओ का येतात” अशा आशयाचा प्रश्न विचारला. तेव्हा चित्रा वाघ यांनी हसत पत्रकारांनाच प्रतिप्रश्न केला. ‘का इंटरेस्ट आहे तुम्हाला या बातमीत पण?’ असा प्रतिप्रश्न त्यांनी पत्रकारांना विचारला.

एकदम ओक्के कार्यक्रम, खांद्यावर महिलेचं डोकं, चित्रा वाघ म्हणाल्या, काय नाना, तुम्ही पण…
व्हिडिओत नेमकं काय?

महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशध्यक्ष नाना पटोले यांचा एक कथित व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल होत आहे. व्हिडिओत पाठमोरी दिसणारी व्यक्ती नाना पटोले असल्याचा दावा केला जात आहे. हॉटेलमध्ये एका महिलेला बिलगून बसल्याचा हा व्हिडिओ मेघालयातील चेरापुंजी येथील पोलो ऑर्किड हॉटेलमधील असल्याचा दावा केला जात आहे. चित्रा वाघ यांनी हा व्हिडिओ ट्विट करत नाना पटोले यांना सवाल विचारला होता. “काय नाना… तुम्ही पण झाडी डोंगार आणि हाटीलात…” अशी कॅप्शन लिहून चित्रा वाघ यांनी हा व्हिडिओ ट्विट केला होता.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : congress leader nana patole takes a dig at bjp chitra wagh over convert video with mystery woman
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here