अमृतसर- पंजाबमधील मानसा जिल्ह्यात २९ मे रोजी गायक सिद्धू मूसेवाला याची हत्या करण्यात आली होती. यानंतर पंजाब पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी सुरू करतात. ६ जून रोजी पंजाबमधील तरनतारन जिल्ह्यातील जौदा गावात मारेकऱ्यांच्या चौकशीसाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा जातो. यावेळी पोलिसांना एका मारेकऱ्याचा शोध होता. या मारेकऱ्याचं नाव म्हणजे जगरूप सिंग उर्फ रुपा. जौडा हे त्याचं मूळ गाव. पोलीस नातेवाईकांकडे चौकशी करतात. रुपाच्या घराचा कसून तपास करतात पण तिथे त्यांना फारसं काही मिळत नाही.

सुमारे तासभर पोलीस गावात मुक्काम करतात. पण त्यांच्या हाती फारसं काही लागत नाही. पण यात रुपाच्या आई-वडिलांचं एक विधान समोर आलं होतं. त्यांच्या प्रतिक्रियेने अनेकांना आश्चर्य वाटलं होतं. रुपाच्या आई-वडिलांनी सांगितलं होतं की, ‘आमचा मुलगा ड्रग्सच्या आहारी गेला होता. चार वर्षांपूर्वी त्याला हाकलण्यात आलं होतं, तेव्हापासून रुपा घरी आणि गावात कधी आलाच नाही. त्याच्याशी आमचा काहीही संबंध नाही. त्याला गोळी घातली तरी आमचं काहीही म्हणणं नाही.’

एन्काउंटरची Inside Story- २ मारेकऱ्यांना मारण्यासाठी आले ६०० पोलीस

विशेष म्हणजे या विधानाच्या बरोबर ४५ दिवसांनंतर, पंजाब पोलिसांचा अमृतसर, तरनतारनच्या शेजारच्या जिल्ह्यात रुपाशी सामना झाला. शार्प शूटर जगरुप सिंग उर्फ रुपा त्याचा साथीदार मनप्रीत मनूसह मारला गेला. जवळपास पाच तास ही चकमक सुरू होती. याचमुळे लोकांना आता रुपाच्या आई- वडिलांची प्रतिक्रिया आठवत आहे.

रुपा

पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाच्या हत्येनंतर फरार शूटर मनप्रीत सिंग उर्फ मनू आणि जगरूप सिंग उर्फ रुपा यांचं काल एन्काटउंटर करण्यात आलं. एन्काउंटरनंतर रुपाची आई पलविंदर कौर यांनी स्वत:ला एका खोलीत बंद करून घेतले होते. त्याचवेळी त्याचे वडील बलजिंदर सिंग म्हणाले, ‘कर्माचं फळ आहे. तुम्ही जसे वागता तसेच तुम्हाला परत मिळते. माझ्या मुलाने मूसेवाला याला गोळी मारली होती, आज त्याची अवस्थाही सर्वांसमोर आहे. रुपाचे वडील बलजिंदर सिंग पुढे म्हणाले की, त्यांचा मोठा मुलगा रणजोत सिंग सैन्यात आहे पण रुपाला ड्रग्जचं व्यसन लागलं, त्याच्या अनेक तक्रारी येऊ लागल्या. एवढंच नाही तर पोलिसही त्याचा शोध घेत घरापर्यंत पोहोचायचे. यानंतर घरच्यांनी त्याला घराबाहेर काढलं.’

अटारी एन्काउंटर संपलं, मूसेवाला हत्याकांडातले चारही शूटर ठार

बलजिंदर पुढे म्हणाले की, ‘रुपाच्या आईने मुलाला चुकीच्या मार्गावर जाण्यापासून अनेकदा रोखले होते. पण तरीही तो कधी ऐकला नाही. मला एकच मुलगा आहे असं मी समजेन, मी मनावर दगड ठेवला आहे, मी रुपाचा मृतदेहही पाहणार नाही आणि त्याचं अंतिम संस्कारही करणार नाही.’ दुसरीकडे, रुपाच्या आई पलविंदर कौर यांनी स्वत:ला खोलीत कोंडून घेतले आहे. गँगस्टर जगरूप सिंग रुपाची आई पलविंदर कौर म्हणाल्या की, ‘जर रूपाने सिद्धू मूसेवालाला मारले तर रुपालाही गोळ्या घाला,’ असे मी आधीच सांगितले होते.

दरम्यान, भारत-पाक सीमेजवळ ५ तास चाललेल्या चकमकीत तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले, तर एका पत्रकाराच्या पायाला गोळी लागली. जखमी पोलीस कर्मचारी आणि मीडिया कर्मचाऱ्यांना इस्पितळात दाखल करण्यात आलं. दुपारपर्यंत चाललेल्या या चकमकीत दोन्ही बाजूंनी १५० हून अधिक गोळ्या झाडण्यात आल्या. गावातील एका जुन्या घरात लपलेल्या गुंडांनी पोलिसांवर एके-४७ ने हल्ला केला. घटनास्थळावरून एक एके-४७ आणि एक पिस्तूलही जप्त करण्यात आले.

आधी आईच्या मैत्रिणीशी लग्न, आता सुष्मिता सेन; ललित मोदी विजय मल्ल्यावरही भारी आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here