Who Gives oath to President of India : भारताचे राष्ट्रपती देशातील प्रथम नागरिक समजले जातात. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीनंतर शपथविधी हा देखील प्रमुख कार्यक्रम असतो. नव्या राष्ट्रपतींचा शपथविधी सोहळा २५ जुलै रोजी होणार आहे.

हायलाइट्स:
- राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा निकाल
- २५ जुलै रोजी शपथविधी
- द्रौपदी मुर्मू याचं पारडं जड
भारताच्या राष्ट्रपतींना शपथ कोण देतं?
भारतीय राज्यघटनेत राष्ट्रपतींची पात्रता, राष्ट्रपतींच्या जबाबदाऱ्या, त्यांचा शपथविधी, राजीनामा, महाभियोग यासंदर्भात दिलेली आहे. राष्ट्रपतींच्या शपथविधीसंदर्भातील माहितीकलम ६० मध्ये मिळते. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवाराला पद आणि गोपनीयतेची शपथ देतात. अपवादात्मक स्थितीत सरन्यायाधीश पदावर नसतील तर सर्वात ज्येष्ठ न्यायमूर्ती शपथ देण्याचं काम काम करतात. राष्ट्रपतींचा कार्यकाळ ५ वर्षांचा असतो.
राष्ट्रपती राजीनामा कुणाकडे देतात?
राष्ट्रपतींना त्यांच्या पदाचा कार्यकाळ संपवण्यापूर्वी राजीनामा द्यायचा असल्यास काय करायचं यासंदर्भातील माहिती देखील राज्यघटनेत देण्यात आली आहे. राष्ट्रपतींना राजीनामा द्यायचा असल्यास उपराष्ट्रपतींच्या पदाला महत्त्व मिळतं. राष्ट्रपती त्यांचा राजीनामा उपराष्ट्रपतींकडे देतात. राष्ट्रपतींच्या गैरहजेरीत उपराष्ट्रपती त्यांच्या परवानगीनं कारभार पाहतात. राष्ट्रपतींच्या राजीनाम्यानंतर पुढील उपराष्ट्रपती पदावरील व्यक्ती राष्ट्रपतींच्या जबाबदारी पार पाडतात. नव्या राष्ट्रपतींची निवड पद रिक्त झाल्यानंतर पुढील सहा महिन्यात करणं आवश्यक असतं.
Maharashtra News Live Updates : राष्ट्रपती निवडणुकीसाठी मतमोजणी सुरु
२५ जुलै रोजी शपथविधी का होतो?
भारतीय राज्य घटनेत राष्ट्रपतींची शपथ नेमक्या कोणत्या दिवशी घेतली जावी यासंदर्भात माहिती दिलेली नाही. १९७७ मध्ये निलम संजीव रेड्डी बिनविरोध विजयी झाले होते, २५ जुलै १९७७ रोजी निलम संजीव रेड्डी यांनी राष्ट्रपती पदाची शपथ घेतली. यानंतर पुढील काळात २५ जुलै रोजीच नव्या राष्ट्रपतींच्या शपथविधीचा सोहळा आयोजित केला जातो. तेव्हापासून ही परंपरा जपली आहे.
एकनाथ शिंदे आता शिवसेनेची प्रतिनिधी सभाही फोडणार, नंदनवन बंगल्यावर सदस्यांची नोंदणी सुरु?
राष्ट्रपतींचा मृत्यू झाल्यास पद कोण सांभाळतं?
राष्ट्रपती पदावर असताना संबंधित व्यक्तीचं निधन झाल्यास त्यांच्या पदाची सूत्रं उपराष्ट्रपतींकडे जातात. मात्र, त्यावेळी सरन्यायाधीशांकडून उपराष्ट्रपतींना राष्ट्रपतीपदाची शपथ दिली जाते. तर उपराष्ट्रपती पदाची जबाबदारी सरन्यायाधीशांकडे जाते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय; आरे कारशेडच्या कामावरील बंदी उठवली
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Marathi News from Maharashtra Times, TIL Network