Metro car shed Aarey Mumbai | फडणवीस सरकारच्या काळात रातोरात झाडे कापून या प्रकल्पाचे काम पुढे रेटण्यात आले होते. परंतु, ठाकरे सरकारने सूत्रे हाती घेतल्यानंतर आरेतील मेट्रोच्या कारशेडचे काम थांबवण्यात आले होते. त्याऐवजी पर्यायी जागेचा शोध सुरु झाला होता. मात्र, शिंदे-फडणवीस सरकारने राज्याची सूत्रे हाती घेताच हा निर्णय बदलण्यात आला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी त्यावर अधिकृतरित्या शिक्कामोर्तब केले.

 

Aarey Carshed

हायलाइट्स:

  • मेट्रो कारशेडचे काम सुरु करण्याचा मार्ग पुन्हा एकदा मोकळा
  • शिंदे-फडणवीस सरकारने राज्याची सूत्रे हाती घेताच हा निर्णय बदलण्यात आला होता
मुंबई: ठाकरे सरकारच्या काळात स्थगिती देण्यात आलेल्या मुंबईच्या आरे परिसरातील मेट्रो कारशेडच्या कामावरील बंदी उठवण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत. आरे परिसरात असलेल्या जंगलामुळे याठिकाणी मेट्रो प्रकल्पाची कारशेड (Aarey Car shed) उभारण्याला विरोध करण्यात आला होता. मात्र, फडणवीस सरकारच्या काळात रातोरात झाडे कापून या प्रकल्पाचे काम पुढे रेटण्यात आले होते. परंतु, ठाकरे सरकारने सूत्रे हाती घेतल्यानंतर आरेतील मेट्रोच्या कारशेडचे काम थांबवण्यात आले होते. त्याऐवजी पर्यायी जागेचा शोध सुरु झाला होता. मात्र, शिंदे-फडणवीस सरकारने राज्याची सूत्रे हाती घेताच हा निर्णय बदलण्यात आला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी बुधवारी त्यावर अधिकृतरित्या शिक्कामोर्तब केले. त्यामुळे आता आरेतील मेट्रो कारशेडचे काम सुरु करण्याचा मार्ग पुन्हा एकदा मोकळा झाला आहे. सरकारने आरेतील कारशेडवरील बंदी उठवली असल्याने मुंबईकर आणि पर्यावरणवादी अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे. (Metro Car shed in Aarey forest area)
कारशेड वहीं बनेगा…मराठी सिनेसष्टीतील अभिनेत्याच्या ट्वीटची चर्चा
एकनाथ शिंदे यांच्या या निर्णयामुळे आता आरे परिसरातच कारशेडच्या कामाला वेगाने सुरुवात होऊ शकते. शिंदे-फडणवीस सरकारने मेट्रो प्रकल्पाची धुरा पुन्हा अश्विनी भिडे यांच्याकडे सोपवली होती. यापूर्वीच या कारशेडचे काही काम पूर्ण झाले आहे. मात्र, आता नवीन वाद निर्माण होऊन तो चिघळण्यापूर्वीच आरेतील मेट्रो कारशेडचे काम शक्य तितक्या जलद गतीने पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असेल. मात्र, आता यावर शिवसेना कितपत आक्रमक भूमिका घेऊ शकते, हे पाहावे लागले. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर आरे कारशेडचा मुद्दा चांगलाच तापण्याची शक्यता आहे.

मुंबई मेट्रो रेल्वेच्या कारशेडसाठी आरे कॉलनीतील झाडांच्या कत्तलीनंतर वादग्रस्त ठरलेल्या मुंबई मेट्रो रेल्वेच्या तत्कालिन व्यवस्थापकीय संचालक आश्विनी भिडे यांची उद्धव ठाकरेंनी सत्तेत येताच उचलबांगडी केली होती. आता नव्याने स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारने मात्र मेट्रोपेक्षा सुपरफास्ट निर्णय घेत अश्विनी भिडे यांच्यावर पुन्हा मुंबई मेट्रोची धुरा सोपवली आहे.
मेट्रोपेक्षा सुपरफास्ट, ठाकरेंनी सत्ता येताच हटवलेलं, आता शिंदेंकडून भिडेंवर पुन्हा धुरा
मेट्रो कारशेड कांजूरऐवजी आरेत करण्यामागे ६० हजार कोटींचा घोटाळा?

आरे कॉलनीतील मेट्रो ३ कारशेडची जागा नेहमीच जंगल होते, असा दावा करणाऱ्या आरे बचाव गटाने (ACG) शुक्रवारी आता एक गंभीर आरोप केला होता. कारशेडच्या निमित्ताने तब्बल ६० हजार कोटी रुपयांच्या जमीन घोटाळा झाल्याचे त्यांनी म्हटले होते. आरे कॉलनी वसाहत ही २०१६ पर्यंत इको-सेन्सिटिव्ह झोन (ESZ) चा भाग होती. जेथे बांधकाम परवानगी देण्यासाठी मनाई करण्यात आली होती. बांधकाम व्यावसायिकांच्या फायद्यासाठी आरे आणि कांजूरमार्ग या दोन्ही ठिकाणी मेट्रो प्रकल्पासाठी आवश्यकतेपेक्षा जवळपास २५० एकर जास्त जमिनीचा दावा आरे बचाव गटाकडून करण्यात आला आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : cm eknath shinde revoke ban on work of metro car shed in aarey mumbai
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here