अजित पवार हे आमचे होणारे उपमुख्यमंत्री आहेत असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. एसीबीकडून अजित पवार यांना क्लीन चिट मिळाली त्याचा आनंदच आहे. ते आमचे होणारे उपमुख्यमंत्री आहेत असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. महाविकास आघाडी सरकारचा शपथविधी २८ नोव्हेंबर रोजी पार पडला. त्यावेळी उद्धव ठाकरे आणि इतर सहा मंत्र्यांनी शपथ घेतली होती. मात्र अजित पवार यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली नव्हती. अजित पवार यांना कोणतं पद दिलं जाणार? याच्या विविध चर्चा रंगल्या होत्या. त्या चर्चांना आता संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. अजित पवार हे आमचे होणारे उपमुख्यमंत्री आहेत असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.