भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्याची सुरुवात वनडे मालिकेने होईल. यासाठी नियमीत कर्णधार रोहित शर्मा, स्टार फलंदाज विराट कोहली आणि जलद गोलंदाज जसप्रीत बुमराह यांना विश्रांती देण्यात आली आहे. वनडे संघाचे नेतृत्व शिखर धवनकडे सोपवण्यात आलय.
वाचा-
..
भारतीय खेळाडू वेस्ट इंडिजमध्ये दाखल झाल्याचे फोटो आणि व्हिडिओ बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केले. संघातील खेळाडूंना इंग्लंडमधून थेट वेस्ट इंडिजला नेण्यात आले. यासाठी बीसीसीआयने खास चार्टर्ड फ्लाइट केली होती आणि त्यासाठी तब्बल ३.५ कोटी रुपये मोजण्यात आले. खेळाडूंना मँचेस्टरहून पोर्ट ऑफ स्पेनला नेण्यासाठी खास विमानाची सोय करण्यात आली.
वाचा-
या विमानातून वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेसाठीचे खेळाडू, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि सपोर्ट स्टाफ देखील होता. काही खेळाडूंच्या कुटुंबातील सदस्य देखील सोबत होते. यामुळेच बीसीसीआयला विमानासाठी तिकीटे बुक करणे अडचणीचे ठरत होते. यावर मार्ग म्हणून थेट ३.५ कोटी खर्च केला.
वनडे मालिकेसाठी भारतीय संघ
शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, इशान किशन, संजू सॅमसन, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग