Mario Draghi : इटलीचे पंतप्रधान मारिओ द्राघी यांच्या राजीनाम्याचं नाट्य अखेर संपलं आहे. मारिओ द्राघी यांनी दिलेला राजीनामा अध्यक्षांनी स्वीकारला असून नव्या पंतप्रधानांची निवड होईपर्यंत काळजीवाहू पंतप्रधान म्हणून ते काम पाहितील.

हायलाइट्स:
- इटलीच्या पंतप्रधानांचा राजीनामा
- अध्यक्षांनी राजीनामा स्वीकारला
- पंतप्रधानांचं राजीनामा नाट्य संपलं
मारिओ द्राघी काळजीवाहू पंतप्रधान
ब्रिटननंतर आता इटलीच्या पंतप्रधानांच्या राजीनाम्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. इटलीच्या पंतप्रधानांनी गुरुवारी राजीनामा देणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, त्यानंतर द्राघी यांना राजीनामा मागं घेण्याची विनंती देखील करण्यात आली होती. अखेर त्यांनी राष्ट्रपतींकडे राजीनामा सोपवला आहे. इटलीत नव्या पंतप्रधानांची निवड काळजीवाहू पंतप्रधान म्हणून काम पाहतील.
मित्र पक्षानं साथ सोडल्यानं निर्णय
इटलीचे पंतप्रधान मारियो द्राघी यांनी गुरुवारी त्यांच्या सहकारी मित्र पक्षांनी राजीनामा देण्याची घोषणा केली होती. द्राघी यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली असली तर राष्ट्राध्यक्षांनी त्यांचा राजीनामा फेटाळला होता. मात्र, आता सात दिवसात इटलीच्या पंतप्रधानांनी पुन्हा राजीनामा दिली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय; आरे कारशेडच्या कामावरील बंदी उठवली
इटलीचे पंतप्रधान मारिओ द्राघी यांच्यासोबत सत्तेत असलेल्या फाईव्ह स्टार मुव्हमेंट या पक्षानं विश्वासदर्शक ठरावावेळी वेगळी भूमिका घेतल्यानं मारिओ द्राघी अडचणीत आले होते. मारिओ द्राघी यांनी राजीनामा दिल्याची घोषणा केल्यानंतरही अध्यक्षांनी तो स्वीकारला नव्हता. अखेर आज मारिओ द्राघी यांनी राजीनामा दिला.
सोनिया गांधींची ED चौकशी, काँग्रेस कार्यकर्ते संतापले; संसद परिसरात झाला राडा
राजीनामा नाट्याची अखेर
मारिओ द्राघी यांच्या राजीनाम्याचं सुरु झालेलं नाट्य अखेर सात दिवसांनी संपलं आहे. गेल्या आठवड्यात इटलीच्या पंतप्रधानांनी राजीनामा दिला होता. अध्यक्षांनी तो नाकारला आणि पुन्हा एकदा मारिओ द्राघी यांनी राजीनामा दिला आहे. आता तो राष्ट्रपतींनी स्वीकारला आहे. मारिओ द्राघी २०२१ मध्ये पंतप्रधान झाले होते. आता मारिओ द्राघी यांचा राजीनामा अध्यक्षांनी स्वीकारला आहे. देशात तातडीनं निवडणुका न घेता अध्यक्ष नव्या पंतप्रधानांची निवड करु शकतात.
शिंदे आता कीर्तिकरांनाही गटात ओढणार? ‘मातोश्री’ निष्ठावंताला मुख्यमंत्री भेटताच तर्क-वितर्क
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Marathi News from Maharashtra Times, TIL Network