मुंबई : मुंबई पोलिसांनी बुधवारी एका व्यक्तीला अटक केली. ज्याच्याकडून व्हेलची उलटी जप्त करण्यात आली आहे. याची किंमत २.६७ कोटी आहे. व्हेलच्या उलटीला एम्बरग्रीस किंवा ग्रे एम्बर असेही म्हणतात. हा प्रतिबंधित सागरी पदार्थ आहे. हीच उलटी चोरून नेणाऱ्या आरोपीला रुग्णवाहिकेतून पकडण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तर आता त्याची रवानगी थेट तुरुंगात करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ वर्षीय वैभव कालेकर याला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने दक्षिण मुंबईतील ट्रायडंट हॉटेलजवळ अटक केली. “तो अंबरग्रीस बेकायदेशीरपणे विकण्याचा प्रयत्न करत असल्याच्या माहितीच्या आधारे त्याला अटक करण्यात आली. झडतीदरम्यान अधिकाऱ्यांना त्याच्याकडे २.६ किलो एम्बरग्रीस आढळून आले.

आजारी लेकराचा जीव वाचवण्यासाठी मातेनं पुरातून काढला मार्ग, धाडसी ‘हिरकणी’चा VIDEO व्हायरल…
कोट्यवधींचे एम्बरग्रीस आले कुठून?
आरोपीने रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथून हे एम्बरग्रीस विकत घेतल्याचा संशय आहे. कारण इथे काही महिन्यांपूर्वी अनेक व्हेल मृत आढळले होते. रत्नागिरी येथील रहिवासी असलेल्या आरोपीला वन्यजीव (संरक्षण) कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

का आहे एम्बरग्रीसवर बंदी ?
एम्बरग्रीसची विक्री भारतात प्रतिबंधित आहे. कारण १९२७ च्या वन्यजीव संरक्षण कायद्याच्या अनुसूची अंतर्गत स्पर्म व्हेल, एक लुप्तप्राय प्रजाती संरक्षित आहे. स्पर्म व्हेल मुख्यतः गुजरातच्या अरबी समुद्रात आणि ओडिशातून बंगालच्या उपसागरात आढळतात असे म्हटले जाते.

ट्रकने गर्भवती महिलेला टक्कर देताच सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का, जे घडलं ते वाचून काळजाचा ठोका चुकेल
परफ्यूम उद्योगात मागणी
एम्बरग्रीसचा वापर परफ्यूम उद्योगात केला जातो. यामध्ये असलेल्या अल्कोहोलचा वापर महागड्या ब्रँडचे परफ्यूम बनवण्यासाठी केला जातो. त्याच्या मदतीने, परफ्यूमचा वास बराच काळ टिकवून ठेवता येतो. यामुळे, त्याची किंमत खूप जास्त आहे. शास्त्रज्ञांनीही याला तरंगणारे सोने असे नाव दिले आहे.

प्रियकराला अश्लील कॉल करताना पतीने रंगेहात पकडलं, जुगारी पत्नीने एकदोन नाही तर तब्बल २८ वेळा..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here