Bhagyashree Rasal | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: Jul 21, 2022, 3:57 PM
poonam pandey on population पूनम पांडे नेहमीच तिचे बोल्ड फोटो आणि तिने घातलेल्या कपड्यांसाठी चर्चेत असते. सध्या सोशल मीडियावर तिचा एक व्हिडिओ व्हायरल होतं आहे. यात पुनम मीडियाशी बोलत आहे.

पूनम नुकतीच मुंबईच्या विमानतळावर स्पॉट झाली होती. फोटोग्राफर्संना फोटोसाठी पोज देत असताना पापाराझीनं तिला देशाच्या वाढत्या लोकसंख्येबद्दल प्रश्न विचारला. मग काय पूनमनं देखील तिच्या अंदाजात उत्तर दिलं. ‘पूनम आपल्या देशात लोकसंख्या नियंत्रणाचा मुद्दा सध्या चर्चेत आहे,यावर तुझं मत काय आहे?, असा प्रश्न एकानं पूनमला विचारला.
लोकसंख्येचा प्रश्न ऐकताच पूनमला हसू आलं, हसता हसताच म्हणाली ‘मग मुलं जन्मालाच घालू नका’. तर लोकसंख्या नियंत्रणात राहण्यासाठी सरकारनं काही प्रयत्न करायला हवेत का? असाही प्रश्न पूनमला विचारण्यात आला होता. यावर पूनम म्हणाली की, हो नक्कीच..१०० टक्के. मुंबईचीच लोकसंख्या किती वेगानं वाढत चाललीय’. पूनमचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Web Title : actress poonam pandey was worried about the growing population reaction went viral
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network