एफबीआयच्या माहितीनुसार, मायुशी भगत २०१६ मध्ये एफ१ स्टुडंट व्हिसाच्या मदतीनं अमेरिकेला पोहोचली. आधी तिनं युनिव्हर्सिटी ऑफ हॅम्पशायरमध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर तिनं न्यूयॉर्क इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये प्रवेश घेतला. एफबीआयच्या नेवार्क विभागानं बुधवारी मायुशीचा समावेश बेपत्ता झालेल्या व्यक्तींच्या यादीत केला. एफबीआयनं मायुशीचा फोटो आणि तिचा तपशील आपल्या संकेतस्थळावर अपडेट केला आहे.
एफबीआयनं दिलेल्या माहितीनुसार, मायुशी भगतला इंग्रजी, हिंदी आणि उर्दू भाषा येतात. न्यूजर्सीच्या दक्षिण प्लेनफील्डमध्ये मायुशीचे मित्र राहतात. कोणाकडे मायुशी भगतची माहिती असल्यास त्यांनी ती स्थाानिक एफबीआय अधिकाऱ्यांना किंवा अमेरिकन दूतावास किंवा वकिलातीला द्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.
mayushi bhagat, मायुशी भगत हरवलीय! अमेरिकेची FBI घेतेय शोध; २८ वर्षांची तरुण नेमकी आहे तरी कोण? – indian woman 28 added to fbis missing persons list after 3 years
वॉशिंग्टन: अमेरिकेत बेपत्ता झालेल्या भारतीय तरुणीचा शोध सुरू आहे. तीन वर्षांपूर्वी न्यूजर्सीतून बेपत्ता झालेल्या तरुणीचा शोध अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (एफबीआय) घेत आहे. मायुशी भगत असं तरुणीचं नाव असून तिचा समावेश एफबीआयनं ‘बेपत्ता झालेल्यांच्या यादीत’ केला आहे. या महिलेला शोधण्यासाठी एफबीआयनं मदत मागितली आहे.