पिटबुलनं टिया यांच्या उजव्या हाताच्या दोन तृतीयांश भागाचे अक्षरश: लचके तोडले. पिटबुलनं टिया यांच्या पायांवरही हल्ला केला. टियानं आरडाओरडा करताच त्यांची मुलगी आणि पती धावत आले. आईवर पिटबुलनं जीवघेणा हल्ला केल्याचं मुलगी टानानं पाहिलं. टानानं टिया यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र कुत्र्यानं टानाच्या पायावर हल्ला केला. त्यानंतर टिया यांच्या पतीनं पिटबुलवर हल्ला चढवला. त्यामुळे पिटबुल तिथून पळून गेला.
पिटबुलनं हल्ला केलेल्या घटनेचे काही फोटो टिया यांनी शेअर केले आहेत. हल्ला झाला त्यावेळी भिंतीवर, फरशीवर अनेक ठिकाणी रक्ताचे डाग पडले. जवळपास ५ मिनिटं पिटबुलचा हल्ला सुरू होता. टिया यांनी मरण अक्षरश: डोळ्यासमोर पाहिलं. मात्र दैव बलवत्तर म्हणून त्या बचावल्या. हर्क्युलसनं टिया यांना जिवंत खाण्याचा प्रयत्न केला होता. गेल्या २ वर्षांपासून हर्क्युलस टिया यांच्याकडे होता. तो अशाप्रकारे हल्ला करेल याची कल्पनादेखील टिया यांनी केली नव्हती.
पिटबुलच्या हल्ल्यात टिया अतिशय गंभीर जखमी झाल्या. २ दिवस त्या व्हेंटिलेटरवर होत्या. १९ दिवसांनंतर त्यांना रुग्णालयातून घरी आणण्यात आलं. टिया यांच्या हात, पाय आणि शरीराच्या अनेक भागांवर जखमा झाल्या. १०० पेक्षा अधिक टाके पडले. हल्ल्याला दोन महिने उलटून गेल्यावरही त्या पूर्णपणे बऱ्या झालेल्या नाहीत.