मुंबई : सध्या सोशल मीडियावर करिना-सैफचा मुलगा जेहच्या फोटोची चर्चा आहे. खूपच गोड बाळ आहे जेह. एका बगीच्यात स्वीमिंग फ्लोट सूट घालून एका फोटोत दिसतोय. तो इतका गोड दिसतोय की फॅन्स त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. करिना कपूर यावेळी इटलीत सुट्टी एंजाॅय करतेय. मुलाचे फोटोही शेअर करत आहे.

हॉटेलला लाजवेल दीपिका- रणवीरचं ११९ कोटींचं घर, पहिली झलक समोर

करिनानं लिहिलं, स्टे कूल जेह बाबा


करिना कपूर सैफ अली खान, तैमुर आणि जेहबरोबर इटलीतल्या फ्लाॅरेन्स शहरात आहे. तिथलेच फोटो तिनं शेअर केले आहेत. फोटो शेअर करत तिथल्या उन्हाळ्याबद्दल तिनं सांगितलं आहे. करिनानं हेही लिहिलं आहे, स्टे कूल जेह बाबा.

एका बास्केटमधून पाहतोय जेह

गोड जेह

करिना कपूरच्या या फोटोवर मनीष मल्होत्रा, मलायका अरोरा, नणंद सबा अली खान अशा अनेकांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे. तसंच करिना कपूरनं इन्स्टाग्राम स्टोरीतही जेहचे फोटो शेअर केले आहेत. त्यातल्या एका फोटोत जेह एका बास्केटमधून बघताना दिसतोय.

मैत्रिणींना भेटली करिना कपूर

मिळून साऱ्याजणी


करिना कपूर अनेक दिवस लंडनला होती. सुट्टी एंजाॅय करत होती. यावेळी अमृता अरोड़ा, नताशा पूनावाला आणि बहीण करिष्मा कपूरही तिथे पोहोचले. शिवाय सैफची बहीण सबाही करिनाला भेटली. जेहबरोबर वेळ घालवला, त्याचे फोटो शेअर केले.

वडील होते CM अन् रितेश करत होता सेक्स कॉमेडी सिनेमे,अभिनेता म्हणतो-मला लाज…

नीतू कपूरचा वाढदिवस साजरा

नीतू कपूरचा वाढदिवस साजरा

या ट्रिपमध्ये अभिनेत्रीची काकी नीतू कपूरही तिथे त्यांना भेटली. नीतू कपूरबरोबर रिद्धिमा आणि नात समायराही होती. यावेळी नीतू कपूरचा वाढदिवस सगळ्यांनी मिळून साजरा केला.

करिनाचे येणारे सिनेमे
करिना लवकरच ‘द डिवोशन पर सस्पेक्ट एक्स’मधून ओटीची पदार्पण करणार आहे. आमिर खानबरोबरचा लाल सिंग चड्ढा ऑगस्टमध्ये रिलीज होणार आहे.

मला गोल्ड डिगर म्हणणाऱ्यांनो… ललित मोदी सोबत रिलेशनच्या चर्चेनंतर सुष्मिताची जळजळीत पोस्ट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here