ठाणे: शिवसेनेत फूट पडल्यानंतर, एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री होत थेट शिवसेनेवरच दावा केल्यानंतर आता ठाकरे कुटुंब प्रचंड सक्रिय झालं आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी शिवसंवाद यात्रा सुरू केली आहे. बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात तिथल्या शिवसैनिकांच्या भेटीगाठी घेण्याचा, त्यांचाशी संवाद साधण्याचा सपाटाच ठाकरेंनी लावला आहे. शिवसंवाद यात्रेच्या अंतर्गत आदित्य ठाकरे आज ठाण्यात होते.

ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेंचं वर्चस्व आहे. महापालिकेतील शिवसेनेच्या ६६ नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे ठाण्यातील आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं होतं. ठाण्यात ठिकठिकाणी आदित्य यांचं शिवसैनिकांनी स्वागत केलं. आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघेंनीदेखील आदित्य यांचं स्वागत केलं. विशेष म्हणजे आदित्य यांनी त्यांची कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या घरासमोर थांबवली. तिथे कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. त्यांच्याशी आदित्य यांनी संवाद साधला आणि त्यानंतर पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाले.
‘माझा मुलगा आणि भावाला फसवून शिंदेंकडे नेले’; शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखाचा खळबळजनक दावा
शिवसैनिकांशी संवाद साधताना आदित्य यांनी नाव न घेता एकनाथ शिंदेंचा समाचार घेतला. खाऊन खाऊन अपचन झालेले लोक सोडून गेले आहेत, अशा शब्दांत आदित्य यांनी शिंदेंवर शरसंधान साधलं. बंड आणि उठाव असे शब्द वापरले जात आहेत. पण हे बंड किंवा उठाव नव्हे, ही गद्दारी आहे, अशी घणाघाती टीका आदित्य यांनी केली.
नगरमध्ये शिवसेनेत फूट?, जुने शिवसैनिक आता उद्धव ठाकरेंना भेटणार
मी लहानपणापासून बघत आलो आहे. जे लोक हक्कानं घरी यायचे. कामं घेऊन यायचे, नवीन जबाबदारी मागायचे. कुटुंबातील सदस्यांप्रमाणे त्यांना शिवसेनेनं आजवर सांभाळलं. त्यांनीच आज पाठीत खंजीर खुपसला. ज्या शिवसेनेनं त्यांना भरभरून दिलं, त्याच पक्षाशी त्यांनी गद्दारी केली, अशा शब्दांत आदित्य बंडखोरांवर बरसले. अडीच वर्षांच्या सत्ताकाळात कोणताही भेदभाव न करता विकासकामं केली. या कालावधीत राजकारण केलं नाही तेच आमचं चुकलं, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here