पालघर : जव्हार तालुक्यातील वाळवंडे येथे कारने दुचाकीला धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला असून इतर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमधील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
गणपत तुंबडा (वय २०), संतोष वझरे (वय २३) अशी या अपघातातील मृत तरुणांची नावे आहेत. हर्षद मेघपुरीया हे देखील या अपघातात किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यासह अपघातातील गंभीर जखमी दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या जखमींवर उपचार सुरू आहेत. या अपघाताची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे.