st bus accident news, एसटी बससह चार वाहनांचा विचित्र अपघात: बसमधील प्रवासी जखमी; एकाची प्रकृती गंभीर – four-vehicle accident with st bus on malegaon shirdi road 4 passengers injured; one is in critical condition
नाशिक : मनमाडपासून जवळ असलेल्या मालेगाव-शिर्डी मार्गावर चार वाहनांचा गुरुवारी रात्री विचित्र अपघात झाला आहे. एसटी बस, ट्रक, ट्रॅक्टर आणि मोटारसायकल या वाहनांची एकमेकांना धडक बसून झालेल्या अपघातात एसटी बसमधील चार प्रवासी जखमी झाले आहेत.
काही दिवसांपूर्वीच एसटी बसला मध्य प्रदेशातील इंदौर येथे झालेल्या अपघाताने राज्य हादरलं होतं. या अपघातात महाराष्ट्रातील अनेक प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यानंतर आता मालेगाव-शिर्डी मार्गावर पुन्हा एकदा बसचा अपघात झाला आहे. यामध्ये जखमी झालेल्या चार प्रवाशांपैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. सदर प्रवाशाला उपचारासाठी मालेगावच्या सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ‘आढळराव पाटलांनी कुठूनही निवडणूक लढवावी, तुमचा पराभव करणारच’; शिवसैनिकाचं चॅलेंज
एसटी बसच्या चालकाने अचानक ब्रेक दाबल्यामुळे मागून येणारा ट्रक, ट्रॅक्टर आणि मोटारसायकल बसवर जाऊन आदळल्याने हा अपघात झाल्याची माहिती आहे. चार वाहनांचा अपघात झाल्याचं कळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना बाहेर काढलं. अपघातात वाहनांचं मोठं नुकसान झालं असलं तरी जीवितहानी झाली नसल्याने सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला.