मुंबई: तुमच्या कंपनीने तुम्हाला राहायला घर दिले असेल आणि त्याचे भाडे कंपनी तुम्हाला देत असेल, तर आता या भाड्यावर त्या कंपनीला सरकारला १८ टक्के द्यावा लागणार आहे. हा कर तुमच्या कंपनीला ‘’अंतर्गत द्यावा लागणार आहे.

अशा प्रकारे भाड्याने दिलेल्या जागेवर ज्याने ती जागा भाड्याने अन्य कोणा व्यक्तीला दिली आहे, त्यासाठी भाड्याने जागा देणाऱ्याला जीएसटी भरावा लागणार हे १३ जुलै रोजी सरकारने स्पष्ट केले. त्यानंतर जीएसटी परिषदेच्या ४७व्या बैठकीतील निर्णय रविवारपासून लागू झाले. यामध्ये ही तरतूददेखील लागू करण्यात आली आहे; याशिवाय समजा तुम्ही वेतनधारक आहात किंवा छोटे व्यावसायिक आहात आणि तुमचे एखादे घर आहे, जे तुम्ही एखाद्या जीएसटी नोंदणीकृत व्यक्तीला किंवा कंपनीला भाड्याने दिलेत, तर त्या भाड्यावर जीएसटी लागू होणार आहे. वरील दोन्ही निर्णयांमध्ये कंपनी किंवा जागामालकासाठी करपूर्तता प्रक्रिया वाढणार आहे.

वाचा-

जीएसटी नोंदणीची स्थिती

– वेतनधारकांना जीएसटी नोंदणी गरजेची नाही.

– सर्व प्रकारच्या व्यावसायिकांनाही जीएसटी नोंदणीची गरज नाही.

– २० लाख रुपये वार्षिक उलाढाल असलेल्या सेवा पुरवठादारांना जीएसटी नोंदणीची अट आहे.

– ४० लाख रुपये वार्षिक उलाढाल असलेल्या साधनसामग्री पुरवठादारांना जीएसटी नोंदणीची अट आहे.

वाचा-

या निर्णयाबाबत बराच गोंधळ आहे. यामध्ये कंपनीने भाड्याने जागा कर्मचाऱ्याला राहण्यासाठी दिल्यास त्यासाठी कंपनी त्याला देत असलेल्या भाड्यावर १८ टक्के जीएसटी कंपनीला भरावा लागणार आहे. त्याच वेळी एखाद्या व्यावसायिकाने स्वतःच्या घरातच कंपनी सुरू केली आणि कागदोपत्री तो त्या कंपनीकडून जागेचे भाडे घेत असेल, तर त्याच्या कंपनीलाही जीएसटी द्यावा लागेल. अर्थात, या संदर्भात प्रचंड गोंधळ आहे. हा गोंधळ सरकार लवकरात लवकर दूर करील, अशी अपेक्षा आहे. – सीए शंतनू बागवे, जीएसटी तज्ज्ञ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here