Eknath Shinde vs Aaditya Thackeray | गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांमध्ये प्रचंड संघर्ष पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर सध्या आदित्य ठाकरे शिवसेना नव्याने बांधण्यासाठी शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून राज्याचा दौरा करत आहेत. आज आदित्य ठाकरे हे नाशिकमध्ये जाणार आहे. यावेळी एकनाथ शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे (Suhas Kande) हे आदित्य ठाकरे यांना भेटण्यासाठी जाणार होते.

 

Suhas Kande Aaditya Thackeray 11 (1)
सुहास कांदे आणि आदित्य ठाकरे

हायलाइट्स:

  • चालेल ना, पण आता मंदिराच्या परिसरात राजकारण नको
  • आमचं मंदिर हे राजकारणासाठी नसतं
  • मी सुहास कांदे यांना निश्चित भेटेन.
नाशिक: एकनाथ शिंदे गटातील आमदार सुहास कांदे यांनी नाशिक दौऱ्यावर असलेल्या आदित्य ठाकरे यांना समोरासमोर भेटण्याची मागणी केली होती. आपण आदित्य ठाकरे यांना सामोरे जाणार असल्याचे त्यांनी म्हटले होते. आम्ही हिंदुत्वासाठी लढतोय, हे आमचं चुकलं का, असा प्रश्न मी त्यांना विचारणार असल्याचे कांदे यांनी म्हटले होते. त्यानंतर आता आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनीही सुहास कांदे यांना भेटण्याची तयारी दर्शविली आहे. आदित्य ठाकरे हे शुक्रवारी नाशिकच्या काळाराम मंदिरात गेले होते. त्यानंतर आदित्य यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

त्यावेळी आदित्य ठाकरे यांना सुहास कांदे यांच्या वक्तव्याविषयी विचारणा करण्यात आली. सुहास कांदे यांनी तुमच्या भेटीची वेळ मागतिली आहे, याकडे आदित्य यांचे लक्ष वेधण्यात आले. त्यावर आदित्य ठाकरे यांनी म्हटले की, चालेल ना, पण आता मंदिराच्या परिसरात राजकारण नको. कारण आमचं मंदिर हे राजकारणासाठी नसतं. मी सुहास कांदे यांना निश्चित भेटेन. त्यांनी मातोश्रीवरही यावं. आम्ही कधीच कोणासाठी दरवाजे बंद केले नव्हते, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
शिंदे गटाचा आमदार आदित्य ठाकरेंना सामोरा जाणार, नाशिकमध्ये हायव्होल्टेज ड्रामा रंगणार?
सुहास कांदे नेमकं काय म्हणाले?

मी आज माझ्या समर्थकांसह आदित्य ठाकरे यांना भेटणार आहे. मी शिवसेनेचे संपर्कप्रमुख जयंत दिंडे यांना फोन केला होता. मला आदित्य ठाकरे यांना भेटायचे आहे, असे मी त्यांना सांगितले. त्यांनी साहेबांशी बोलून कळवतो, असे सांगितले. मी आता मनमाडला जाण्यासाठी निघालो आहे, असे कांदे यांनी सांगितले. त्यामुळे आता आदित्य ठाकरे आणि सुहास कांदे आमनेसामने येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाशिकमध्ये काय घडणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या.
Amit Thackeray : मुंबई ते अंबरनाथ….’राजपुत्रा’चा लोकलने प्रवास; VIDEO व्हायरल
‘आदित्य ठाकरेंच्या हातामध्ये शिवबंधन का नव्हतं?’

सुहास कांदे यांनी अनेक मुद्द्यांवरून आदित्य ठाकरे यांना जाब विचारला आहे. आम्ही आदित्य ठाकरे यांच्याविरोधात काहीच बोलणार नाही. मातोश्री हे आमचं पंढरपूर आहे. उद्धवसाहेब हे आमचे विठ्ठल आहेत. त्यामुळे आम्ही त्यांच्यावर टीका करणार नाही. पण मला आदित्य ठाकरे यांना एक प्रश्न विचारायचा आहे. काल त्यांच्या भाषणावेळी हातामध्ये भगवा धागा दिसत नव्हता. त्यांच्या हातामधलं शिवबंधन कुठे गेलं? त्यांनी हे प्रतिक सोडलंय का, असा सवाल सुहास कांदे यांनी उपस्थित केला.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : i am ready to meet eknath shinde camp suhas kande says aaditya thackeray in nashik maharashtra
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

44 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here