Ajit Pawar & Devendra Fadnavis Birthday: देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा आज (२२ जुलै) वाढदिवस असून या निमित्ताने पुण्यातील दोन पोस्टरची राज्यभरात चर्चा सुरू झाली आहे.

 

Ajit Pawar Devendra Fadnavis Birthday
पुणे : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार ( ajit pawar ) यांचा आज (२२ जुलै) वाढदिवस आहे. संपूर्ण राज्यभरात या दोन नेत्यांच्या कार्यकर्त्यांचं मोठे जाळ आहे. त्यामुळे दोघांवरही शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पुण्यात मात्र या दोन्ही नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त एक वेगळीच चर्चा रंगली आहे.

पुण्यातील अलका चौकात अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचे समोरासमोर फ्लेक्स लावण्यात आले आहेत. एका बॅनरमध्ये एकच पालक अजित पवार असे लिहिलेल आहे, तर देवेंद्र फडवणीस यांच्या बॅनरवर निष्कलंक नेतृत्व निर्विवाद कर्तुत्व असा मजकूर आहे. अगदी समोरासमोर लावण्यात आलेल्या या बॅनर नंतर आता राजकीय क्षेत्रासह पुण्यात चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे.

वाचा- मंदी येतेय; आर्थिक निर्णय घेताना घ्या काळजी, पाहा दिग्गज कंपन्या काय करत आहेत

fadnavis

राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर पुण्यामध्ये मात्र माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच चढावोढ सुरु असल्याचे चित्र दिसत आहे. सत्ता बदल झाल्यानंतर पुण्याचा पालकमंत्री कोण? यावर मोठी चर्चा होत आहे. यामध्ये पुण्याचे पालकमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे नाव पुढे येत आहे. याचाच धागा पकडत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपला डिवचले आहे. ‘बैठका होतील…ताफा दिसेल पण अशी धडाडी तिथे नसेल,एकच पालक ‘ असा मजकूर लिहीत राष्ट्रवादीने फडणवीसांनी लक्ष केले आहे.

pawar

वाचा- मुंबई ते अंबरनाथ….’राजपुत्रा’चा लोकलने प्रवास; VIDEO व्हायरल

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : ajit pawar and devendra fadnavis birthday today, poster war was staged in pune
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here