मुंबई: मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध आणि प्रेक्षकांचे लाडके अभिनेते मकरंद अनासपुरे यांचा आज वाढदिवस. ‘रानबाजार’मधील भूमिकेसाठी ते चर्चेत होते. आता त्यांच्या आगामी दे धक्का २ या चित्रपटाचीही चर्चा सुरू आहे. अनासपुरेंच्या वाढदिवसानिमित्त चाहते आणि इतर सेलिब्रिटींकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. पण एका मित्रानं अनासपुरेंना दिलेल्या शुभेच्छा खास आहे.

प्रसिद्ध लेखक आणि मकरंद अनासपुरे यांचे मित्र अरविंद जगताप यांनी एक खास पोस्ट शेअर करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

काय आहे अरविंद जगताप यांची पोस्ट?

मकरंद …त्याच्याकडे बघून मराठवाड्यातल्याच नाही तर कुठल्याही ग्रामीण भागातल्या मुलाला आपल्या बोली भाषेत बोलायचा आत्मविश्वास वाटू लागतो. विनोद ही ओळख बनलेला पण समाजाबद्दल अत्यंत गंभीर आणि संवेदनशील माणूस. हसल्याने आयुष्य वाढतं म्हणतात. मकरंद तुझ्यामुळे आमच्या आयुष्यातले काही दिवस नक्की वाढले असणार. ते मौजेचे आहेत. तू खुप अविस्मरणीय कामं केलीस. त्यातलं नाम हे एक काम सुद्धा आयुष्याची ओळख म्हणून पुरेसं आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा.
पत्नीसोबत केलंय पाच सिनेमांत काम, तुम्हाला माहितीये का कोण आहे मकरंद अनासपुरेंची बायको?
Koffee With Karan- सामंथा प्रभूने पोटगी म्हणून मागितले २५० कोटी? घटस्फोटानंतर सुखात आहे अभिनेत्री

कामाबद्दल बोलायचं झालं तर ‘दे धक्का’ सिनेमात धमाल केल्यानंतर आता मकरंद अनासपुरे दे धक्का २ सिनेमातही प्रेक्षकांना हसवणार आहेत, हे प्रोमोवरून चांगलंच जाणवतंय. दे धक्का २ सिनेमाची कथा लंडनला घडतेय. टीझरच्या सुरुवातीलाच रिपोर्टर मकरंद अनासपुरेची मुलाखत घेताना दिसतेय. ती विचारतेय, तुमचा पुढचा काय प्लॅन आहे? त्यावर मकरंद म्हणतो, ‘स्वत:ची कार आम्ही आणतोय सहा महिन्यामध्ये.’ मग ती विचारते, नाव काय कारचं? त्यावर तो उत्तर देतो, ‘हनुमान. त्यांची मारुती. तर आमची हनुमान.’ अशा कोट्या या टीझरमध्ये भरपूर दिसतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here