मुंबई : राज्याचे ४ वेळा उपमुख्यमंत्री राहिलेले, सध्या विरोधी पक्षनेत्याची धुरा खांद्यावर असलेले राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar Birthday) यांनी आज ६४ व्या वर्षात पदार्पण केलंय. त्यांच्या वाढदिनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. अजित पवार यांच्या शिस्तीचे, वक्तशीरपणाचे अनेक किस्से महाराष्ट्रातील जनतेने ऐकले आहेत. तसेच अजितदादांच्या राजकीय विरोधकांनी ते खुल्या दिलाने मांडले आहेत. चार आठवड्यांपूर्वी राज्याच्या राजकारणात राजकीय भूकंप झाला. शिवसेनेतील आतापर्यंतचं सगळ्यात मोठं बंड झाला. तब्बल ४० हून अधिक आमदारांपैकी निम्म्या आमदारांनी मविआ सराकरमध्ये निधी मिळत नसल्याचा आरोप केला. सार्वजनिक हिताची कामं प्राधान्याने करणं मग ते काम विरोधकाचं असेल तरी नियमाबाहेर जाऊन संबंधित कामाला मदत करणं, असं अजितदादांचं व्यक्तिमत्व आहे. अजितदादांच्या याच व्यक्तिमत्वाचे किस्से सांगत त्यांचे स्वीय सहाय्यक (Ajit Pawar PA Sunilkumar Musale) सुनीलकुमार मुसळे यांनी बंडखोर आमदारांचे निधी मिळत नसल्याचे आरोप नावासकट उडवून लावले आहेत.

* अजित पवार यांचे पीए सुनीलकुमार मुसळे यांची फेसबुक पोस्ट

एकेकाळी दादांचे सहकारी राहिलेल्या परंतू राजकीय हेतूने प्रेरीत झाल्याने अचानक निधी बाबत व्यर्थ दोष देऊन दादांच्या बदनामीचे कारस्थान काही काळापासून घडत आहे. सहकाऱ्यांचीच काय पण विरोधकांची देखील सार्वजनिक हिताची कामं प्राधान्याने करणारे अजितदादांचे सहकारी, विरोधकांनी सांगितलेल्या काही आठवणींना आज उजळा देणे क्रमप्राप्त ठरते. “काय असेल ते असेल, वेळ प्रसंगी राज्याचे बजेट त्यावर खर्ची घालू, पण बच्चू कडू यांची मागणी पूर्ण झाली पाहिजे”- अजित पवार

पुण्याचं पालकमंत्रिपद फडणवीसांकडे? अजितदादांचा निकटवर्ती आमदार म्हणतो, आता कोणीही…
“अजितदादा जलसंपदा आणि पाणीपुरवठा मंत्री असताना माझ्या मतदारसंघात पूर्णा प्रकल्पातून १०५ गावांना पाणीपुरवठा करणारी केंद्र सरकारची योजना होणार होती. ज्या गावांमध्ये दुषित आणि पिण्यासाठी अयोग्य पाणी आढळलं त्या गावांसाठी ही योजना राबवण्यात येणार होती. परंतु ही पाईपलाइन माझ्या मतदारसंघातून जात होती. त्यामुळे ज्या गावांच्या शेजारून ही पाईपलाइन जात आहे त्या गावानाही या पाण्याचा लाभ मिळायला हवा अशी माझी मागणी असल्याने ही योजना मी वर्षभर अडवून ठेवली. हे अजीतदादांना समजलं, त्यांनी तातडीने बैठक ठरवली. सर्व संबंधित खात्यांचे अधिकारी उपस्थित होते. तांत्रिकदृष्ट्या माझी मागणी योजनेत बसणारी नसतानाही ती व्यावहारिकदृष्ट्या योग्य असल्याचे दादांच्या लक्षात आलं. तेव्हा दादांनी अधिकाऱ्यांना ठामपणे बजावले कि ‘काय असेल ते असेल, वेळ प्रसंगी राज्याचे बजेट त्यावर खर्ची घालू, पण यांची मागणी पूर्ण झाली पाहिजे’

अजितदादा पाणीपुरवठा मंत्री होते म्हणूनच हे होऊ शकले. माझ्यासारख्या अपक्ष आमदाराला मतदारसंघातल्या विकासकामासाठी चौकटीच्या बाहेर जाऊन केलेली मदत व्यक्तिगत माझ्यासाठी आणि मतदारसंघातल्या जनतेसाठी अत्यंत महत्वाची ठरली. तसच अचलपूर पाणीपुरवठा योजनेत स्थानिक स्वराज्य संस्थांचं अंशदान म्हणून २५ कोटी रुपये भरावे लागणार होते. ही रक्कमही त्यांनी कमी करून दिली. दादांच्या या कणखरपणामुळे मी भारावून गेलो. त्यांच्या कणखरपणाच्या आत एक अत्यंत जिव्हाळ्याचा आणि आत्मीयतेचा माणूसही दडलेला आहे.
या कणखरपणाला नेहमीच सलाम करतो ! – आ. बच्चू कडू

Devendra Fadanvis Speech: राजकारणात अजितदादांच्या प्रेमाची दादागिरी चालते; फडणवीसांकडून तोंडभरून कौतुक
* विरोधी पक्षाचे असूनही स्व. पांडुरंग फुंडकरांना निवडून आणलं

राज्य सहकारी बँकेची निवडणूक असताना अजितदादा बैठक बोलावतात आणि सर्वपक्षीय लोकांना संचालक मंडळावर संधी द्यायचे ठरवत स्वतःच्या पक्षाच्या कोट्यातली उमेदवारी प्रतिस्पर्धी पक्षाचे नेते, विरोधक स्व. पांडुरंग फुंडकर साहेब यांना देत त्यांना निवडून आणतात.

* मुनगंटीवारांना निधी

मा. सुधीर मुनगंटीवार यांच्या मतदारसंघातील ‘हुमन प्रकल्प’ त्यांच्या मतदारसंघातील लोकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असताना त्या प्रकल्पासाठी १८० कोटी रुपयांचा निधी (NPV) मिळावा म्हणून मुनगंटीवार जेव्हा मदत मागतात तेव्हा अधिकाऱ्यांचा नकार असतांनाही आपल्या विरोधकाबद्दल कटुता मनात न ठेवता अजित दादा सिंचन विभागातून एका दमात १८० कोटीची तरतूद करून देतात.

* अजितदादा राजकीय हेतून कधीच कामं अडवत नाहीत

अजित दादा कधीही राजकीय हेतूनं सार्वजनिक कामं अडवत नाहीत मग ती आपल्यावर राजकीय स्वार्थापोटी विखारी, धादांत खोटी टीका करणाऱ्या विरोधकांची का असेना हेच वारंवार अधोरेखित होत राहते. विरोधकांच्या सार्वजनिक हिताच्या कामांचा निधी रोखणे, अडवणे, जिरवणे आजकालच्या राजकीय संस्कृतीत सर्रास सुरु असताना जस्टीस & फेअर प्ले या उदारमतवादी पाश्चत्य संकल्पनेवर आधारभूत असलेली ‘स्टेट्समनशिप’ कशी असावी याचे उत्तम उदाहरण म्हणजे अजित दादा आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here