लंडन: भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची मुलगी सारा सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. सारा प्रवासाची आवड आहे आणि ती जेव्हा जेव्हा फोटो शेअर करते तेव्हा ते व्हायरल होतात.

सारा जयपूर, गोवा, थायलंडनंतर आता लंडनमध्ये पोहोचली आहे. अर्थात ती तेथे शिक्षण देखील घेत आहे. सारा लंडन आणि मुंबईत दोन्ही ठिकाणी राहते. सोशल मीडियावर सक्रीय असते. यावेळी तिने लंडनमधील डिनरचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. लंडनमध्ये साराने तिचा लहान भाऊ अर्जून सोबत डिनर केल्याचे काही फोटो आणि व्हिडिओ इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत. लंडनमधील या दोघांच्या भेटीची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे.

वाचा- गुड न्यूज: नीरज चोप्राची फायनलमध्ये धडक, पहिल्याच प्रयत्नात सुवर्णपदकाची दावेदारी

साराने अर्जुन सोबत एक फोटो शेअर केला आहे. ज्यात दोघे हिंदी चित्रपट मुन्नाभाई एबीबीएस मधील मुन्ना भाई आणि सर्किट यांच्या स्टाईलमध्ये उभे आहेत. साराने हा फोटो शेअर करताना संजय दत्त आणि अरशद वारसी यांचा चित्रपटातील फोटो देखील शेअर केलाय.

फोटोत सारा सर्किट तर अर्जुन मुन्नाभाई च्या भूमिकेत उभी आहे. सारा आणि अर्जुन यांनी अरशद आणि संजय दत्त यांच्या सारखेच कपडे देखील घातले आहेत.

वाचा- मंदी येतेय; आर्थिक निर्णय घेताना घ्या काळजी, पाहा दिग्गज कंपन्या काय करत

वाचा- टी-२० क्रिकेटमध्ये आजवर कोणाला जमले नाही; पहिली मॅच, पहिली ओव्हर आणि झाला…

गेल्या काही महिन्यांपासून सारा तिचे फोटोशूट देखील करत आहे. काही रिपोर्ट्सनुसार सारा बॉलिवुडमध्ये पदार्पण करण्याची शक्यता आहे. अर्थात त्यावर साराकडून अधिकृत काही सांगितले गेले नाही. दुसऱ्या बाजूला जलद गोलंदाज अर्जुनचे अजून आयपीएल आणि भारतीय संघाकडून पदार्पण झाले नाही. अर्जुन गेल्या दोन हंगामापासून मुंबई इंडियन्स संघासोबत आहे. पण अद्याप त्याला पदार्पणाची संधी मिळाली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here