मंगळुरू: लिपलॉक चॅलेंजचं आयोजन करणाऱ्या आठ विद्यार्थ्यांविरोधात कर्नाटक पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. पॉस्को कायद्याच्या अंतर्गत पोलिसांनी ही कारवाई केली आहे. सहा महिन्यांपूर्वी मंगळुरूतील एका फ्लॅटवर हा संपूर्ण प्रकार घडला. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. व्हायरल व्हिडीओमध्ये एक मुलगा शाळकरी मुलीला किस करताना दिसत आहे.

विद्यार्थ्यांनी दोन महिन्यांसाठी फ्लॅट भाड्यानं घातला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. यानंतर विद्यार्थी त्यांच्या प्रेयसींना घेऊन फ्लॅटवर गेले. तिथे ते ट्रूथ अँड डेअर खेळले. तिथेच लिपलॉक स्पर्धाही झाली, असं पोलिसांनी सांगितलं. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक महाविद्यालयीन तरुण आणि मुलगी एकमेकांना किस करताना दिसत आहे. त्याचवेळी त्यांच्या आसपास असलेले त्यांचे मित्र त्यांना प्रोत्साहन देत आहेत. हा सगळा प्रकार लिपलॉक स्पर्धेचा भाग होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.
अरे कोण तू? ट्रेनिंगदरम्यान प्रेमविवाह; पोलीस दलात नोकरी लागताच पत्नी पतीला विसरली
फ्लॅटमध्ये लिपलॉक स्पर्धेवेळी उपस्थित असलेल्या व्हिडीओ व्हॉट्स ऍपवर शेअर केला. हा प्रकार शाळेतील शिक्षकांच्या कानावर गेला. यानंतर काही विद्यार्थ्यांना शाळेतून कमी करण्यात आलं. आरोपींपैकी काही विद्यार्थी प्रतिष्ठित महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांनी अमली पदार्थांचं सेवन केलं होतं का याचाही तपास पोलीस करत आहेत.
तुम्ही नका ना जाऊ! मुख्याध्यापकाच्या बदलीनंतर विद्यार्थी ढसाढसा रडले; गुरुजीही गहिवरले
या प्रकरणी पांडेश्वरा महिला पोलीस ठाण्यात पोस्को कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी चार विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलं आहे. त्यामध्ये व्हॉट्स ऍपवर व्हिडीओ अपलोड करणाऱ्याचा समावेश आहे. प्रकरणातील एक आरोपी परदेशी गेल्याचं कळतं. विद्यार्थ्यांविरोधात आयपीसीच्या कलम ३७६, ३५४, ३५४ (सी) आणि १२० (बी) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांकडून आरोपींची चौकशी सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here