पुणे : आपण आपल्या आजूबाजूला अनेक दारू विक्रीची दुकाने पाहतो. अनेक ठिकाणी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दुकान चालक अनेक प्रकारच्या ऑफरही लावतात. मात्र, पुणे जिल्ह्यातील लोणीकाळभोर परिसरातून दारूची साठीची एक आगळी वेगळी ऑफर एका हॉटेल चालकाने लावली आहे. विशेष म्हणजे ती ऑफर फक्त त्या परिसरात असणाऱ्या एमआयटीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी.

लोणी काळभोर हद्दीतील कदमवाकवस्ती इथे एका परमिट रूम हॉटल मालकाने एमआयटी कॉलेजच्या विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी चक्क ७९९ रुपयांत दोन तास अनलिमिटेड दारू फक्त एमआयटीच्या विद्यार्थ्यांसाठी असा बोर्ड लावला होता. मात्र, लोणी काळभोर पोलिसांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी हॉटेल चालकाला ताब्यात घेतलं.

Hingoli: मध्यान्ह सुट्टीत १० वीतील विद्यार्थिनीचे कृत्य पाहून पोलीसही चक्रावले, हातावर कापलेल्या खुणा अन्…
देवी प्रसाद सुभाष शेट्टी ( वय ३३) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून पोलीस नाईक प्रदीप भीमराव क्षीरसागर यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांचे पथक लोणी काळभोर परिसरात गस्त घालत असताना गुरुवारी (दि.२१) कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील एमआयटी परिसरातील ‘द टीप्सी टेल्स’ हॉटेलच्या समोर, महामार्गाच्या बाजूला एक फ्लेक्स लावल्याचे पोलिसांना दिसले. त्या पोस्टरवर फक्त एमआयटीच्या विद्यार्थ्यांसाठी ७९९ रुपयेमध्ये दोन तास अनलिमिटेड ड्रिंक्स असा बोर्ड लावलेला होता.

आरारा खतरनाक! नद्यांमधून वाहत होते १८ लाकडाचे लठ्ठे, तपास करताच अधिकारी चक्रावले
या बोर्ड बाबत पोलिसांनी ‘द टीप्सी टेल्स’ हॉटेलच्या मालकाला याबाबत बोर्डची विचारणा केली तर त्याने मुलांना आपल्या हॉटेलकडे आकर्षित करण्यासाठी व व्यवसायाची विक्री वाढवण्यासाठी आपण हा बोर्ड लावला असल्याचे सांगितले. याप्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलमानुसार मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या आगळ्या वेगळ्या ऑफरने परिसरात एकाच चर्चा सुरू झाली. हॉटेल चालक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी काय करतील याचा काही नेम नाही. मात्र, या ऑफरने विद्यार्थी चांगलेच अचंबित झाल्याचे पाहायला मिळाले.

PHOTOS: ३० वर्षानंतर पत्नीची शेवटची इच्छा झाली पूर्ण; डॉक्टरांनी साईबाबांना वाहिला सोन्याचा मुकूट; किंमत आहे…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here