धीना असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. धीना गेमिंगशी संबंधित यूट्यूब चॅनल चालवायचा. SELFLO असं या चॅनलचं नाव आहे. धीनानं आत्महत्या केली, त्यावेळी त्याचे आई-वडील झोपले होते. ते दोघेही नोकरी करतात. बुधवारी रात्री साडे आठ वाजता धीनाची आई कामावरून घरी आली. त्यावेळी धीना त्याच्या खोलीत झोपला होता, अशी माहिती सायबराबादचे पोलीस निरीक्षक एल. रवी कुमार यांनी दिली.
धीना घरातच ऑनलाईन वर्गाला हजेरी लावायचा. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यानं त्याच्या आयुष्याबद्दल नमूद केलं आहे. त्यात दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत. यूट्यूब चॅनलवर फारसे प्रेक्षक नाहीत आणि करिअरबद्दल मार्गदर्शनाचा अभाव यांचा उल्लेख धीनानं सुसाईड नोटमध्ये केला आहे. मी आयुष्यावर नाराज आहे. जीवनात काय करायचं त्याची मला कल्पना नाही. मला खूप एकटं वाटतंय, अशा शब्दांत धीनानं चिठ्ठीत म्हटलं आहे.
Home Maharashtra youth commits suicide, यूट्यूब चॅनलचे फॉलोअर्स वाढत नाहीत! चिंताग्रस्त तरुणानं उचललं टोकाचं...
youth commits suicide, यूट्यूब चॅनलचे फॉलोअर्स वाढत नाहीत! चिंताग्रस्त तरुणानं उचललं टोकाचं पाऊल – hyderabad youtuber ends life over fall in viewers to his online channel
हैदराबाद: हैदराबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यूट्यूब चॅनलच्या प्रेक्षकांची संख्या कमी झाल्यानं एका २३ वर्षीय तरुणानं आत्महत्या केली आहे. हा तरुण आयआयआयटीटीएम ग्वाल्हेरमध्ये शिकत होता. एका रहिवासी इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून त्यानं जीवन संपवलं.