सोशल मीडियावर पोलीस ठाण्यातील एक फोटो व्हायरल झाला आहे. फोटोत एक पुरुष महिला शिपायाचा गणवेश उभा असल्याचं दिसतं. पोलिसांनी अवैध शस्त्रास्त्रं आणि अमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणात तिघांना अटक केली. त्यात एका महिलेचा समावेश होता.

घटना गुजरातमध्ये घडली आहे. मात्र भारतातल्या गुजरातमधली नाही. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात गुजरात नावाचं शहर आहे. गुजरातच्या दौलत नगर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी एका महिलेला अमली पदार्थ आणि अवैध हत्यारांच्या विक्री प्रकरणात एका महिलेला अटक केली. कोणत्याही गुन्ह्यात आरोपीला अटक करण्यात आल्यानंतर या कारवाईत सहभागी असलेले पोलीस पकडण्यात आलेल्या आरोपींसह फोटो काढतात. आरोपींमध्ये महिलेचा समावेश असल्यास महिला शिपाई गरजेची असते.
अमली पदार्थ आणि अवैध हत्यारांच्या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली. त्यानंतर आरोपींचा फोटो काढण्यात आला. त्या फोटोत महिला शिपाईची उपस्थिती गरजेची होती. मात्र पोलीस ठाण्यात महिला शिपाई हजर नव्हती. त्यामुळे दौलत नगर पोलीस ठाण्याच्या प्रमुखांनी पुरुष शिपायालाच हिजाब परिधन करून उभं राहण्यास सांगितलं आणि फोटो काढला.
पोलिसांनी काढलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. हिजाब परिधान केलेला पुरुष असल्याचं नेटकऱ्यांनी ओळखलं आणि पोलीस ट्रोल झाले. प्रकरण तापू लागताच पोलीस ठाण्याच्या प्रमुखांना निलंबित करण्यात आलं. आता या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Marathi News from Maharashtra Times, TIL Network