मुंबई : आताच ६८व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा झाली. २०२०साठी हे पुरस्कार जाहीर झाले. त्यात यंदाही राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये मराठी सिनेमांनी बाजी मारली आहे. अभिनेत्री सायली संजीव आणि अभिनेता शशांक केतकर याच्या भूमिका असेलल्या ‘गोष्ट एका पैठणीची’ सिनेमाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झालाय. तर राहुल देशपांडे यांना ‘मी वसंतराव’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट गायकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

अँड द नॅशनल अॅवॉर्ड गोज टू… विजेत्यांची यादी वाचा एका क्लिकवर

प्लॅनेट मराठी आणि अक्षय बर्दापूरकर निर्मित ‘गोष्ट एका पैठणीची’चा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान झाला. त्यावर सायली संजीवनं व्हिडिओ शेअर करत म्हटलं आहे, ‘मला प्रतिक्रिया देणं शक्य नाहीय. कारण खूप आनंद झालाय. बाबांची आठवण येतेय. कारण त्यांची खूप इच्छा होती की मला असा एखादा मानाचा पुरस्कार मिळावा. गोष्ट एक पैठणीची हा सिनेमाच्या माझ्या हृदयाच्या सर्वात जवळचा सिनेमा आहे आणि तो कायम राहील.’

याशिवाय प्लॅनेट मराठी, अश्रय बर्दापूरकर, दिग्दर्शक शंतनू रोडे या सगळ्यांचे तिने आभार मानले आहेत. तसंच सिनेमाच्या सर्व कलाकारांचे, तंत्रज्ञांनाही तिनं धन्यवाद दिले आहेत. मागे एका मुलाखतीत तिनं गोष्ट एका पैठणीची सिनेमाबद्दल सांगितलं होतं.

गोष्ट एका पैठणीची

एका मध्यमवर्गीय विवाहित महिलेच्या भूमिकेत सायली आहे. त्यामुळे तिच्या या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. ‘माझ्या अभिनयाच्या प्रवासातलं सगळ्यात सुंदर वळण म्हणजे ‘पैठणी’. ही ‘पैठणी’ मला मनापासून…कष्टाने विणायची आहे. त्यासाठी तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असू द्या, हीच विनंती..!.असं सायलीनं म्हटलं होतं.

68th National Film Awards :’गोष्ट एका पैठणीची’ सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट

सिनेसृष्टीत महत्त्वाच्या आणि मानाच्या मानल्या जाणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा आज २२ जुलै २०२२ रोजी करण्यात आली. या पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ तर सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून अजय देवगणची घोषणा करण्यात आली.

दगडूचा सभ्य अवतार अन् पालवीचा ट्विस्ट घेऊन आला टाइमपास ३

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here