Bhandara Accident News : भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यात रस्त्यावरील खांबावर पथदिवे लावत असतांना विजेच्या ताराला हाताचा स्पर्श झाल्याने एका युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

 

A young man who climbed an electric pole to light a street died on the spot
पथदिवे लावायला विजेच्या खांब्यावर चढला, त्यानंतर होत्याचं नव्हतं झालं…

हायलाइट्स:

  • पथदिवे लावताना विजेच्या ताराला स्पर्श झाल्याने युवकाचा मृत्यू
  • भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील धक्कादायक घटना
  • सरपंच यांच्या हलगर्जीपणामुळे युवकांचा बळी गेल्याची चर्चा
भंडारा : सरपंचांच्या सांगण्यावरून रस्त्यावरील खांबावर पथदिवे लावत असताना विजेच्या ताराला स्पर्श झाल्याने एका युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सुंदरलाल यादोराव कटरे (वय ३२ वर्ष) रा. नवेगाव असं मृत कर्मचाऱ्यांचे नाव असून घटना भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील आंधळगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नवेगाव/धुसाळा येथे घडली आहे.

मयत सुंदरलाल कटरे हा सरपंच रामकृष्ण पुंडे यांच्या सांगण्यावरून ग्रामपंचायतीचे रोजगारावर पथदिवे लावण्याचे काम करत होता. मात्र, सरपंच रामकृष्ण पुंडे व मृतक हे कोणत्याही प्रकारचे महावितरण विभागाला सूचना न देता मनमर्जीप्रमाणे काम करायचे. हा व्यक्ती नेहमी प्रमाणे ग्रामपंचायतीचे पथदिवे लावण्याकरता वीज प्रवाह सुरू असतानाच पथदिवे लावण्याची कामे करायचा आणि पथदिवे लावतांना वीज कार्यालयाला त्याची सूचना ही देण्यात येत नव्हती असं सांगण्यात आलं आहे.

उद्धव ठाकरेंना शाखांवर फिरावं लागतं यासारखं दुर्दैव नाही, गुलाबराव पाटलांचं टीकास्त्र
गुरुवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास सरपंचांच्या आदेशावरून मयत सुंदरलाल हा खांबावर चढून हे काम करत असतांनाच त्याला विजेचा जबर धक्का बसला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती होताच गावात या घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, गावात सरपंच यांच्या हलगर्जीपणामुळे युवकाचा बळी गेल्याचं बोललं जात आहे.

National Film Awards :’गोष्ट एका पैठणीची’ सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : a young man who climbed an electric pole to light a street died on the spot
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here