धुळे: शहरातील प्रभाग क्र. १९ मधील एमआयएम पक्षाच्या नगरसेविका हिना पठाण यांचे भाऊ अमीर पठाण यांच्यावर आज सकाळी पांझरा नदी किनारच्या अंजानशाह दाता सरकार दर्ग्यासमोर भर चौकात अचानक आलेल्या चौघांनी हल्ला चढवला. बेसबॉलच्या बॅटने पठाण यांच्या पायावर जबर मारहाण करण्यात आल्याने अमीर पठाण गंभीर जखमी झाले आहेत.

आज सकाळी एमआयएमचे आमदार डॉ. फारुक शाह यांच्या हस्ते दाता सरकार दर्गा येथील विविध विकास कामांचा शुभारंभ करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी अमीर पठाणसुद्धा आले होते. कार्यक्रम संपल्यावर सर्व जण निघाले. त्यावेळी पठाण आपले वाहन काढण्यासाठी दर्ग्यासमोरील रोडवरून एकटे जात असताना तिथे काही तरुण हातात बेसबॉल बॅट घेऊन आले. त्यांनी अमीर पठाण यांच्याशी वाद घालून थेट हल्ला चढवला. अमीर पठाण यांच्या पायावर बॅटने जबर मारहाण करत त्यांना रक्तबंबाळ केले. हल्ला करणाऱ्या चार तरुणांनी अमीर पठाण यांच्या खिशातून चाळीस हजार रुपये रोख, गळ्यातील सोन्याची चैन, मोबाईल, घड्याळ घेऊन पळ काढला.
यूट्यूब चॅनलचे फॉलोअर्स वाढत नाहीत! चिंताग्रस्त तरुणानं उचललं टोकाचं पाऊल
गावगुडांनी भावावर हल्ला केला असून त्यांचा वेळीच बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी नगरसेविका हिना पठाण यांनी केली. अमीर पठाण वॉर्डमधील माझी सर्व कामे बघतात. वॉर्डचा सर्वांगीण विकास गावगुंडांच्या डोळ्यात खुपत आहे. त्यामुळे वारंवार ते माझ्या भावाला धमकी देत असतात. जावेद नक्ट्या या गावगुंडांने माझ्या भावाला जीवे मारण्याची धमकीदेखील दिली आहे. त्यामुळे या गावगुंडांचा वेळीच बंदोबस्त झाला नाही, तर आम्ही संपूर्ण परिवार धरणे आंदोलन करू असा इशारा हिना पठाण यांनी यावेळी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here