कल्याण पूर्वेतील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विठ्ठलवाडी परिसरात एका स्मशानभूमीत संपूर्णपणे अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. या ठिकाणी लाईट नसल्याने गाडीच्या उजेडात मृतांवर अंत्यविधी करावे लागत आहेत.त्यामुळे मृतांच्या कुटुंबीयांना मनस्ताप सहन करावा लागत असून,या कुटुंबातील नागरिकांनी गाडीच्या बॅटरीच्या उजेडात अंत्यविधी उरकावे लागत असल्याने कल्याण महापालिकेविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
‘काय तो पाऊस, काय ते खड्डे.. केडीएमसी ओकेमध्ये !’; खड्ड्यात पोहणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ व्हायरल
कल्याण पूर्वेतील प्रभाग क्रमांक ९५ नेहरू नगर येथील रहिवासी परशुराम कदम यांच्या निधन झाले. त्यांचा अंत्यसंस्कार शुक्रवारी विठ्ठलवाडी स्मशानभूमीत करण्यात आला. यावेळी स्मशानभूमीत लाईट नसल्याने मोबाईल टॉर्च आणि स्कुटरच्या लाईटच्या उजेडात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करावा लागला. मी केडीएमसीला विनंती करतो, याच्या अगोदर जेव्हा जेव्हा आम्ही तिकडे गेलो तेव्हा तेव्हा तिकडे लाईट नसतो. यावर अद्याप तोडगा निघालेला नाही. तरी केडीएमसीचे नवीन आयुक्त आले आहेत त्यांना मी विनंती करतो की आपण लवकरात लवकर तिकडे बॅटरी ठेवावी. जनरेटर ठेवावा जेणेकरून तिकडे कुठल्याही प्रकारची अडचणी निर्माण होणार नाही. नाहीतर आम्हाला शिवसेना स्टाईलने आंदोलन करावे लागेल, असा इशारा सूर्यकांत सोनावणे यांनी दिला.
ठाण्यातील वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा
ठाण्यातून अहमदाबाद, गुजरात, पश्चिम मुंबई, नाशिक, पुणे, कोकण, रायगड, नवी मुंबई या शहरांना जोडणाऱ्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी आहे. ठाण्यात खड्डे, वाहनांची संख्या आणि वाहतुकीचे नियोजन या मुख्य तीन कारणांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. या वाहतूक कोंडीमुळे ठाण्यातील माजिवाडा परिसरात ५ किलोमिटरपर्यंत लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळतात. एकीकडे खड्ड्यांचे साम्राज्य, दुसरीकडे बाहेरून आलेल्या वाहतुकीची गाड्यांची संख्या आणि तिसरीकडे वाहतुकीचे अपुरे नियोजन या तीन गोष्टींमुळे शहरात ठीक ठिकाणी मुख्य महामार्गांवर जोडणाऱ्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळत आहे.