Jalna clash and police firing | हा सगळा वाद नेमका कशामुळे निर्माण झाला, याची ठोस माहिती अद्याप समोर आलेली नाही. शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास जालना पोलिस अधीक्षक कार्यालयातून बैठक संपल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक साईनाथ रामोड हे बदनापूर पोलीस ठाण्याच्या दिशेने जात होते. त्यावेळी नागेवाडी परिसरातील बुद्ध विहारासमोर असलेल्या बंद पेट्रोल पंपाच्या जागेजवळ तुफान हाणामारी सुरु असल्याचे त्यांना दिसले.

हायलाइट्स:
- तुंबळ हाणामारी सुरु असल्याने कोणीही ऐकायला तयार नव्हते
- एकमेकांवर धारदार शस्त्रांनी वार करण्याचा प्रयत्न
- रामोड यांनी आपली पिस्तूल बाहेर काढून हवेत गोळीबार केला
हा सगळा वाद नेमका कशामुळे निर्माण झाला, याची ठोस माहिती अद्याप समोर आलेली नाही. शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास जालना पोलिस अधीक्षक कार्यालयातून बैठक संपल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक साईनाथ रामोड हे बदनापूर पोलीस ठाण्याच्या दिशेने जात होते. त्यावेळी नागेवाडी परिसरातील बुद्ध विहारासमोर असलेल्या बंद पेट्रोल पंपाच्या जागेजवळ तुफान हाणामारी सुरु असल्याचे त्यांना दिसले. तेव्हा पोलीस अधिकारी रामोड यांनी दोन्ही गटांमधील वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. परंतु, तुंबळ हाणामारी सुरु असल्याने कोणीही ऐकायला तयार नव्हते. दोन्ही गटांकडून एकमेकांवर धारदार शस्त्रांनी वार करण्याचा प्रयत्न केला जात होता. या सगळ्यांच्या हातात काठ्या, कुदळ, फावडे आणि लोखंडी सळ्या होत्या. ही परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पोलीस अधिकारी साईनाथ रामोड यांच्या लक्षात आले. त्यामुळे रामोड यांनी आपली पिस्तूल बाहेर काढून हवेत गोळीबार केला. त्यामुळे हाणामारी थांबून पुढील अनर्थ टळला.
या तुंबळ हाणामारीत दोन्ही गटातील ४ ते ५ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षकांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. घटनास्थळी मोठा पोलिस बंदोबस्त घटनास्थळी दाखल झाला असून बदनापूर आणि चंदनझिरा पोलिस ही घटनास्थळी दाखल झाले आहेत. दोन गटात झालेल्या हाणामारीचं कारण समोर आलं नसलं तरी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान या हाणामारीच्या घटनेतील जखमींवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Web Title : major clash between two groups with sharp weapons in jalna maharashtra police api cop fired round in air
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network