Election commission | केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेतील दोन्ही गटांना कागदोपत्री पुरावे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. आयोगाने ८ ऑगस्टला दुपारी १ वाजेपर्यंत आपलं म्हणणं मांडण्याची मुदत दोन्ही गटांना दिली आहे. त्यानंतर निवडणूक आयोग या प्रकरणी सुनावणी करणार असल्याचे समजते. निवडणूक आयोगाचा कौल काय असणार, यावर उद्धव ठाकरे यांचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे.

 

Eknath Shinde Uddhav Thakceray master image (1) (1)
एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे

हायलाइट्स:

  • शिवसेनेतील ४० आमदार आणि १२ खासदार फुटले
  • एकनाथ शिंदे गटाकडून सातत्याने शिवसेनेत उभी फूट पडल्याचा दावा केला जात आहे
  • प्रतिनिधी सभेतील दोन तृतीयांश सदस्य आपल्या बाजूला असल्याचे शिंदे गटाचे म्हणणे
मुंबई:उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटात शिवसेनेच्या मालकीवरून सुरु असलेल्या वादाचा फैसला आता लवकरच केंद्रीय निवडणूक आयोगाकडून केला जाणार आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर शिवसेनेतील ४० आमदार आणि १२ खासदार त्यांच्यासोबत फुटून बाहेर निघाले होते. मात्र, त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळ आणि संसदेत आपल्याकडे बहुमत असल्याचा दावा करत संपूर्ण शिवसेना (Shivsena) पक्षावरच आपला दावा सांगितला होता. एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगाला पत्र पाठवून शिवसेना पक्ष आणि त्याचे धनुष्यबाण चिन्ह हे आपल्याला मिळावे, अशी विनंती केली होती. तर दुसरीकडे शिवसेनेकडूनही निवडणूक आयोगाकडे यासंदर्भात कॅव्हेट दाखल करण्यात आले होते. या सगळ्यानंतर आता केंद्रीय निवडणूक आयोग सक्रिय झाला असून त्यांच्याकडून शिवसेना नेमकी कुणाची याचा सोक्षमोक्ष लावला जाणार आहे. (EC seeks documentary evidence from Uddhav Thackeray, Eknath Shinde camps to prove majority)
शिंदे-फडणवीस सरकारचे धक्क्यांमागून धक्के; ठाकरे सरकारच्या १४ महिन्यांतील कामांना स्थगिती?
त्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेतील दोन्ही गटांना कागदोपत्री पुरावे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. आयोगाने ८ ऑगस्टला दुपारी १ वाजेपर्यंत आपलं म्हणणं मांडण्याची मुदत दोन्ही गटांना दिली आहे. त्यानंतर निवडणूक आयोग या प्रकरणी सुनावणी करणार असल्याचे समजते. निवडणूक आयोगाचा कौल काय असणार, यावर उद्धव ठाकरे यांचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे. निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिल्यास उद्धव ठाकरे यांना शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह गमवावे लागू शकते. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील ठाकरेंचे भवितव्य अस्थिर होऊ शकते.
शिंदे समर्थक संतोष बांगर यांच्या अडचणी वाढणार? विधानसभेला टक्कर दिलेला नेता सेनेच्या वाटेवर
एकनाथ शिंदे गटाकडून सातत्याने शिवसेनेत उभी फूट पडल्याचा दावा केला जात आहे. आमदार, खासदार, जिल्हाप्रमुख, शाखाप्रमुख, जिल्हापरिषद अशा प्रत्येक स्तरावर आमच्याकडे जास्त संख्याबळ असल्याचा दावा एकनाथ शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर शिवसेनेत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या प्रतिनिधी सभेतील दोन तृतीयांश सदस्य आपल्या बाजूला असल्याचे शिंदे गटाचे म्हणणे आहे. प्रत्यक्षात तसे घडल्यास उद्धव ठाकरे मोठ्या अडचणीत येऊ शकतात. गेल्या काही दिवसांत भाजपसोबत राजकीय संसार थाटलेल्या एकनाथ शिंदे गटाकडून प्रत्येक कायदेशीर पाऊल पूर्ण वेळ घेऊन आणि काळजीपूर्वक टाकले जात आहे. आता निवडणूक आयोगापुढे एकनाथ शिंदे आपली बाजू कशी मांडतात, हे पाहावे लागेल. तर उद्धव ठाकरे शिवसेना आपल्याकडे ठेवण्यासाठी काय करणार, याकडेही सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : election commission seeks proof documents from uddhav thackeray shiv sena and eknath shinde camp
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here