Pune Mulshi News : पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील (Mulashi Taluka) चाळीस गावांच्या वाहतुकीचा प्रश्न आता सुटणार आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख (Rajesh Deshmukh) यांनी एबीपी माझाच्या बातमीची दखल घेऊन नांदीवली ते लोणावळा (Lonavala Road) दरम्यानचा वाहून गेलेला पुल पुन्हा बांधण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या आहेत. 

जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता, कार्यकारी अभियंता आणि अधिक्षक अभियंता यांच्याशी संपर्क करून पुढील दोन दिवसात या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्याचा आराखडा सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.  त्यानुसार वाहून गेलेला पुल पुन्हा बांधण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर रस्त्याच्या कडेला संरक्षक भिंत देखील बांधण्यात येणार आहे.  

पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील नांदीवली गावापासून लोणावळ्याला जाणाऱ्या रस्त्यावरील पुल मागील वर्षी झालेल्या पावसात वाहून गेला होता. मात्र त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघातील चाळीस गावातील एस टी वाहतूक एक वर्षांपासून बंद राहिली. स्थानिक लोक त्यांच्या खाजगी वाहनांनी जीव मुठीत धरून इथून प्रवास करत होते. मात्र एस टी वाहतूक बंद असल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत होता. मात्र आता जिल्हा नियोजनामधून या पुलाच्या कामासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

देशमुख यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता, कार्यकारी अभियंता आणि अधिक्षक अभियंता यांच्याशी संपर्क करून पुढील दोन दिवसात या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्याचा आराखडा सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.  त्यानुसार वाहून गेलेला पुल पुन्हा बांधण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर रस्त्याच्या कडेला संरक्षक भिंत देखील बांधण्यात येणार आहे. यामुळं आता परिसरातील 40 गावांमधील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या

Maharashtra Politics : शिवसेना खासदार विनायक राऊतांच्या आरोपावर राहुल शेवाळे स्पष्ट बोलले, म्हणाले…

Maharashtra Politics : आदित्य ठाकरे यांच्यानंतर उद्धव ठाकरे ही राज्याच्या दौऱ्यावर, नियोजन सुरू

Maharashtra Politics : शिंदे आणि ठाकरे गटाच्या याचिकांवरची पुढील सुनावणी 1 ऑगस्टला होणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here