Aaditya Thackeray Shiv samvad Yatra | आदित्य ठाकरे यांच्या बिडकीनमधील रोड शो वेळी रस्त्याच्या दुतर्फा प्रचंड गर्दी होती. त्यांना पाहण्यासाठी इमारतीच्या गच्चीवरही लोक जमले होते. एकूण आदित्य ठाकरे यांच्या रोड शोला प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसला. त्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्येही प्रचंड चैतन्य संचारले होते. आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेला आणि भाषणांना मिळणारा प्रतिसाद असाच वाढत राहिला तर शिंदे गटासाठी ही नक्कीच चिंतेची बाब ठरू शकते.

हायलाइट्स:
- वैजापूर, खुलताबाद परिसरात आदित्य ठाकरे यांचे जोरदार स्वागत
- बिडकीन येथे आदित्य ठाकरे यांनी मोठे शक्तीप्रदर्शन केले
- आदित्य ठाकरे यांच्या बिडकीनमधील रोड शो वेळी रस्त्याच्या दुतर्फा प्रचंड गर्दी होती
आदित्य ठाकरे हे शुक्रवारी सकाळी नाशिकमध्ये होते. त्यानंतर संध्याकाळी ते औरंगाबादच्या दिशेने रवाना झाले होते. औरंगाबादेत येताना वैजापूर, खुलताबाद परिसरात आदित्य ठाकरे यांचे अशाचप्रकारे मोठे स्वागत झाले होते. तेव्हादेखील प्रचंड गर्दी होती. त्यानंतर औरंगाबादमध्ये झालेल्या सभेत आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेला सोडून गेलेल्या बंडखोर आमदारांवर टीकेचे आसूड ओढले होते. यानंतर आज आदित्य ठाकरे पैठण, नेवासा, शिर्डी असा प्रवास करणार आहेत. आज त्यांच्या मराठवाड्यातील शिवसंवाद यात्रेचा समारोप होणार आहे. त्यापूर्वी पैठण मतदारासंघातील बिडकीन येथे आदित्य ठाकरे यांनी मोठे शक्तीप्रदर्शन केले.
आदित्य ठाकरे यांच्या बिडकीनमधील रोड शो वेळी रस्त्याच्या दुतर्फा प्रचंड गर्दी होती. त्यांना पाहण्यासाठी इमारतीच्या गच्चीवरही लोक जमले होते. एकूण आदित्य ठाकरे यांच्या रोड शोला प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसला. त्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्येही प्रचंड चैतन्य संचारले होते. आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेला आणि भाषणांना मिळणारा प्रतिसाद असाच वाढत राहिला तर शिंदे गटासाठी ही नक्कीच चिंतेची बाब ठरू शकते. गेल्या काही दिवसांमध्ये शिवसेनेतील अनेक पदाधिकारी शिंदे गटाला जाऊन मिळत आहेत. मात्र, आदित्य ठाकरे शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून शिवसेनेला पुन्हा उभारी देणार का आणि पक्षाला लागलेली गळती थांबवणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
‘गद्दारांनी प्रश्न विचारायचे नसतात, तुमची तेवढी लायकी नाही’
आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी नाशिकमधील सभेत बंडखोर आमदार सुहास कांदे यांच्यावर सडकून टीका केली होती. मी गद्दारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देणार नाही. कारण गद्दारांना प्रश्न विचारायचा अधिकार आणि त्यांची तेवढी लायकीही नसते, अशा घणाघाती शब्दांत शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांवार प्रहार केला. तुम्ही गद्दार नसतात तर मी तुमच्या आरोपांना, प्रश्नांना उत्तरं दिली असती. शिवसैनिकांनी प्रश्न विचारले तर मी त्याला उत्तर दिलं असतं. तुम्ही पहिले गद्दारी का केली, याचं उत्तर द्या, अशा शब्दांत आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी बंडखोरांना खडसावले होते.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Marathi News from Maharashtra Times, TIL Network