Sharad Pawar on Eknath Shinde CM post | आता त्यांनी सरकारच असंच चालवायचं ठरवलं आहे. साधारणत: संबंध सत्ता केंद्रित ठेवून दोघांनीच सरकार चालवायचे, ही भूमिका त्यांनी स्वीकारलेली दिसत आहे. त्याला त्यांच्या राज्यातील सहकाऱ्यांची आणि केंद्रातील नेतृत्त्वाची संमती आहे. ते सत्ताधारी आहेत. ते जे काही करतील, ते आपल्याला स्वीकारावं लागले, असे शरद पवार यांनी म्हटले.

हायलाइट्स:
- मनावर दगड ठेवून आपण सर्वांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले आहे
- चंद्रकांत पाटील यांचं खळबळजनक वक्तव्य
- या वक्तव्यामुळे आता नव्या चर्चेला तोंड फुटले आहे
शरद पवार यांनी शनिवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना शिंदे-फडणवीस सरकारच्या रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराविषयी विचारणा करण्यात आली. त्यावर शरद पवार यांनी म्हटले की, ठीक आहे, आता त्यांनी सरकारच असंच चालवायचं ठरवलं आहे. साधारणत: संबंध सत्ता केंद्रित ठेवून दोघांनीच सरकार चालवायचे, ही भूमिका त्यांनी स्वीकारलेली दिसत आहे. त्याला त्यांच्या राज्यातील सहकाऱ्यांची आणि केंद्रातील नेतृत्त्वाची संमती आहे. ते सत्ताधारी आहेत. ते जे काही करतील, ते आपल्याला स्वीकारावं लागले, असे शरद पवार यांनी म्हटले.
किमान शब्दांत कमाल अपमान! शरद पवारांनी नितेश राणेंना अनुल्लेखानेच मारले
यावेळी शरद पवार यांना नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेविषयी विचारणा करण्यात आली. त्यावर शरद पवार यांनी नितेश राणे यांना अनुल्लेखानेच मारले. नितेश राणे यांनी ट्विट करत उद्धव ठाकरेंवर केलेल्या आरोपाबद्दल विचारलं असता शरद पवारांनी पोराबाळांच्या वक्तव्यावर मी प्रतिक्रिया देण योग्य नाही, असे त्यांनी म्हटले.
एकनाथ शिंदेंच्या सुरक्षा वादावर भाष्य
सुरक्षा कुणाला द्यायची याची चर्चा कॅबिनेटमध्ये होत नाही. मुख्य सचिव, गृहसचिव, डीजी होम या वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती असते. त्यांच्या बैठकीत याबाबत निर्णय होतो. माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मला सांगितलं की त्यांना झेड दर्जाची सुरक्षा होती. गडचिरोलीचे पालकमंत्री असल्यानं त्यांना अधिकची सुरक्षा दिली होती, असंही दिलीप वळसे पाटील यांनी सांगितल्याची माहिती शरद पवारांनी दिली.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Web Title : ncp chief sharad pawar taunts chandrakant patil over bjp giving cm post to eknath shinde
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network