हे वाचा-‘हजारो लोकांसमोर न्यूड होईन’, रणवीर सिंगनं केलं जबरा विधान
दरम्यान समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अबू आझमी यांनी रणवीरच्या न्यूड फोटोंवर प्रतिक्रिया दिली आहे. शनिवारी सोलापूर दौऱ्यावर असताना त्यांनी हिजाबचे समर्थन करत त्यांचे मत मांडले. याशिवाय अबू आझमी यांनी ट्वीट करुन देखील टिप्पणी केली आहे. त्यांनी सात रस्ता येथील शासकीय विश्रामगृह याठिकाणी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी रणवीरच्या फोटोबाबत बोलताना म्हटले की, देशात नग्नता वाढली आहे आणि हे टीव्ही-मोबाइलमुळे ही नग्नता वाढली आहे. त्यांनी याचा विरोध करत हिजाबचे समर्थन केले आहे.
भारतीय संस्कृतीचे समर्थन
‘देशातील राजस्थान, उत्तर प्रदेश या राज्यात आज देखील घुंगट प्रथा आहे. घरात आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार करताना तेथील महिला,आपला चेहरा दाखवत नाहीत. परपुरुषासमोर त्या महिला आपला घुंगटने चेहरा झाकतात. इस्लाम धर्मात हिजाबची प्रथा आहे. पण या देशात हिजाब प्रकरणावरून हिंदू मुस्लिम वातावरण तयार झाले. हिजाब महिलांची सुरक्षा करते आणि यालाच न्यायालयात आवाहन देण्यात आले आहे’, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
हे वाचा-वयाच्या ४४ व्या वर्षी राणी मुखर्जी प्रेग्नंट? बेबी बंप लपवण्याचा प्रयत्न Video मध्ये कैद

लिव्ह इन रिलेशनशिपला मान्यता तर हिजाबला का नाही?
टीव्ही आणि मोबाईल मुळे देशातील नग्नता वाढली आहे. देशातील अनेक कायद्याना मान्यता देण्यात आली आहे. एका महिलेला परपुरुषासोबत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहण्यास मुभा देण्यात आली आहे. समलैंगिकतेला मान्यता देण्यात आली आहे. अशा घाणेरड्या कृत्यांना मंजुरी दिली जाते. इस्लाम धर्मात महिलांना डोक्यापासून पायापर्यंत पर्दाप्रथा आहे, याचा मात्र विरोध केला जातो आणि आता त्या बॉलिवूड हिरोने सर्व मर्यादा ओलांडल्यात,’ अशी टीका त्यांनी केलीये.
रणवीरचा फोटो शेअर करत केलं ट्वीट
अबू आझमी यांनी या फोटोशूटबाबत एक ट्वीटही केले आहे. त्यांनी यामध्ये रणवीर सिंग, आमीर खान आणि मिलिंद सोमण यांचे न्यूड फोटोशूट त्यांचे चेहरे ब्लर करत शेअर केले आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, ‘नग्न शरीराचे प्रदर्शन करण्याला कला आणि स्वातंत्र्य म्हणतात, तर संस्कृतीनुसार मुलीला जर हिजाब परिधान करून शरीर झाकायचे असेल तर त्याला अत्याचार आणि धार्मिक भेदभाव म्हटले जाते. अखेर आपल्याला कसा समाज हवा आहे? नग्न फोटो सार्वजनिक करण्याचे स्वातंत्र्य आहे, मग हिजाब का घालू नये?’. त्यांनी तिखट शब्दात केलेल्या या टीकेवर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.