फ्लॅट संस्कृतीमुळे शेजाऱ्यांसोबतचा संवाद कमी झाला. माणसं इतकी व्यस्त झाली की त्यांना एकमेकांशी बोलायला वेळ नाही. त्यामुळे आपल्या शेजारी कोण राहतंय, ते काय करतात याचं अनेकांना सोयरसुतक नसतं. लंडनमध्ये असाच एक प्रकार घडला आहे. एका घरात वृद्ध महिलेचा मृतदेह सापडला. तिच्या घराबाहेर पत्रांचा ढिग जमा झाला. मात्र त्याकडे कोणाचंच लक्ष गेलं नाही.

आग्नेय लंडनमध्ये असलेल्या पेक्खममध्ये वास्तव्यास असलेल्या शीला सेलेवै यांचा मृतदेह फ्लॅटमध्ये आढळून आला. त्यांच्या मृतदेहाची पूर्णपणे विल्हेवाट लावली होती. फक्त हाडांचा सापळा उरला होता. या महिलेला तिच्या शेजाऱ्यांनी ऑगस्ट २०१९ मध्ये शेवटचं पाहिलं होतं. त्यामुळे या महिलेचा मृत्यू ऑगस्ट २०१९ मध्ये झाला असावा असा अंदाज आहे. या महिलेच्या घराचं गॅस कनेक्शन कापण्यात आलं होतं. मात्र यानंतरही घरमालकाला घरभाडं मिळत होतं.
अरे कोण तू? ट्रेनिंगदरम्यान प्रेमविवाह; पोलीस दलात नोकरी लागताच पत्नी पतीला विसरली
द मिररनं दिलेल्या वृत्तानुसार, ऑगस्ट २०१९ नंतर शीला कोणालाच दिसल्या नाहीत. घराबाहेर पत्रांचा ढिग पडला होता. गॅसचं कनेक्शन कापण्यात आलं होतं. अखेर एका शेजाऱ्यानं याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी फ्लॅटचा दरवाजा तोडला. त्यावेळी त्यांना ६१ वर्षांच्या शीला यांचा मृतदेह दिसला. शीला यांच्या हाडांचा सांगडाच शिल्लक राहिला होता.
यूट्यूब चॅनलचे फॉलोअर्स वाढत नाहीत! चिंताग्रस्त तरुणानं उचललं टोकाचं पाऊल
शीला यांच्या हत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मृतदेह अतिशय कुजलेल्या स्थितीत सापडल्यानं, केवळ हाडंच दिसत असल्यानं पोलिसांनी फॉरेन्सिकची मदत घेतली. हाडं महिलेची असल्याचं दातांच्या तपासणीतून समोर आलं. महिलेच्या घरातील फ्रीज उघडून पाहिला असता त्यातील बहुतांश खाद्यपदार्थांवरील तारीख ऑगस्ट २०१९ मधील होती. २०१९ पासून शीला बेपत्ता असताना त्याबद्दलची तक्रार का नोंदवली नाही, असा प्रश्न पोलिसांनी घरमालकाला विचारला. तेव्हा महिलेच्या मृत्यूनंतरही मालकाला घरभाडं मिळत होतं ही माहिती पोलिसांना समजली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here