पुणे : पुरंदर मधील जनता आणि येथील शेतकरी बांधवांनी शिवसेनेवर सातत्याने प्रेम केलेलं आहे. जनतेच्या मनामधील जे सिंहासन आहे त्याच्यावर फक्त ठाकरे आणि शिवसेना हेच नाव लिहिलेलं आहे आणि कायम असेल, असं प्रतिपादन शिवसेना उपनेत्या नीलम गोऱ्हे यांनी पुरंदर येथे आयोजित शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात केलं आहे. पुणे ग्रामीण आणि पुरंदर विधानसभा येथील पदाधिकारी मेळाव्याचे आयोजन आज सासवड येथे शासकीय विश्रामगृहावर करण्यात आले होते, त्यावेळी त्या बोलत होत्या.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कधीच माफ करणार नाहीत

पुरंदर तालुक्यातील माजी आमदार हे मी शिवसेना सोडली असे जाहीर सांगतात आणि ज्या गटात गेले ते सांगतात आम्ही शिवसेनेचे कार्यकर्ते आहोत. परंतु येथील शिवसेनेच्या आमदाराने सांगितलं की, शिवसेनेतून बाहेर पडले आहेत त्यांनी शिवसेना सोडली आहे. या सर्वांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कधीच माफ करणार नाहीत. पुढील काळात न्यायालयातून नक्कीच शिवसेनेला न्याय मिळेल. असंही त्या यावेळी म्हणाल्या.

निकालापूर्वीच शिवसेना-राष्ट्रवादीचं ठरलेलं, म्हणून ठाकरे फोन घेत नव्हते, फडणवीसांचा दावा
पुन्हा एकदा उद्धवजी ठाकरे हे महाराष्ट्राचे नेतृत्व करतील

पुन्हा एकदा उद्धवजी ठाकरे हे महाराष्ट्राचे नेतृत्व करतील असा विश्वास नीलम गोऱ्हे यांनी मेळाव्यात व्यक्त केला. पुरंदर येथील सर्व प्रश्नांवर उद्धवसाहेब, आदित्यसाहेब यांचे नेहमीच लक्ष आहे. खंडोबा मंदिराचा आराखडा असेल, गुंजवणीच्या पाण्याचा प्रश्न असेल, रस्त्यांचे विषय असतील या सर्वांवर बैठक घेऊन मार्ग काढण्याचे काम मी स्वतः केले आहे, असे डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी सांगितलं. पूर्वीचे आमदार यांनी फक्त स्वतःचे हित जपले शिवसैनिकांना सातत्याने त्रास देण्याचे काम देखील त्यांनी केले आहे. परंतु आता सचिन अहिर आणि रवींद्र मिर्लेकर आणि मी स्वतः पदाधिकारी आणि शिवसैनिकांना न्याय देण्याचे जबाबदारी घेत असून सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिकांच्या मागे खंबीरपणे उभे असल्याचे सांगत कार्यकर्त्यांना डॉ. गोऱ्हे यांनी आज विश्वास दिला.

हल्लाबोल करणार, आसूड ओढणार, गौप्यस्फोट होणार, राऊत-ठाकरेंच्या मुलाखतीची तारीख ठरली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here