हे वाचा-नेमकं काय घडलं होतं रंजना यांच्या आयुष्यात? उलगडणार अभिनेत्रीचा जीवनप्रवास
नेहाने दीपेशच्या अंत्यसंस्काराबाबतही माहिती दिली आहे. नेहाने अशी प्रतिक्रया दिली आहे की, ‘हे ऐकून मला धक्का बसला आहे. कशी प्रतिक्रिया द्यावी ते समजत नाही. मी सध्या मुंबईत नाही आण मी लवकरच दीपेश भानच्या घरी जाणार आहे. मी मुंबई त्यांच्या अंतिम दर्शनासाठी जात आहे.’ ई-टाइम्सशी बोलताना नेहा म्हणाली की, ‘मी सध्या पुण्यात आहे. याची माहिती मिळताच मी मुंबईला जाण्याच्या तयारीत आहे. ‘भाभी जी घर पर है’ आणि ‘मे आय कम इन मॅडम’ सारख्या शोमध्ये मी दीपेश भानसोबत काम केले असल्याने मी दीपेशला कधीही विसरू शकत नाही.’
नेहाने पुढे असं म्हटलं की, ‘खरं सांगायचं तर दीपेश भान खूप फिट व्यक्ती होता. शेवटी काय झालं तेच मला समजत नाही. हे सर्व कसं घडलं? दीपेशने गेल्या नोव्हेंबरमध्ये त्याची आई गमावली होती. त्यांच्या निधनाबद्दल ऐकून मला धक्का बसलाय. यावर काय प्रतिक्रिया देऊ कळत नाहीए.’ या घटनेनंतर सुन्न पडल्यासारखं वाटत असल्याची प्रतिक्रिया अभिनेत्रीने दिली आहे.
हे वाचा-त्यांच्यासाठी नाना पाटेकर ‘छोटा ॲक्टर’; काजोल-श्रीदेवीनेही दिलेला फिल्मसाठी नकार

अभिनेत्याच्या आठवणीत नेहा पेंडसेची भावुक पोस्ट
नेहाने दिलेल्या माहितीनुसार दीपेश यांच्यावर मुंबईतच २३ जुलै रोजी अंत्यसंस्कार होणार आहेत. ती पुढे म्हणते की, ‘आयुष्य खूप लहान आहे. मी सध्या शोच्या संपूर्ण टीमच्या संपर्कात आहे. ते मला अपडेट्स देत आहेत. मला लवकरात लवकर मुंबई गाठायची आहे. सध्या त्यांच्या घरी सर्व नातेवाईकांची प्रतीक्षा केली जातेय, सर्व नातेवाईक पोहोचताच अंत्यसंस्कार केले जातील.’ दरम्यान अभिनेत्रीने इन्स्टाग्राम स्टोरीमधे देखील अभिनेत्याचा फोटो पोस्ट करून त्याला श्रद्धांजली वाहिली आहे. तिने या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, ‘एक दयाळू व्यक्ती म्हणून तू नेहमी आमच्या आठवणीत राहशील.’