west bengal youth getting intoxicated by condom: सुरक्षित लैंगिक संबंधांसाठी कंडोमचा वापर केला जातो. मात्र पश्चिम बंगालच्या दुर्गापूर जिल्ह्यातील तरुण कंडोमचा वापर नशेसाठी करत आहेत. अनेकांना कंडोमच्या नशेचं व्यसन लागलं आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांत दुर्गापूर सिटी सेंटर, बिधान नगर, बेनाचिती आणि मुचीपारामध्ये फ्लेवर्ड कंडोमची विक्री वाढली आहे.

कंडोमला बराच वेळ गरम पाण्यात टाकून ठेवल्यानंतर त्यातील एरोमॅटिक कंपाऊंड बाहेर पडतात. या कंपाऊंडचं रुपांतर अल्कोहोलमध्ये होतं. त्याचा वापर नशा करण्यासाठी केला जातो. दुर्गापूरमधील दुकानांमधून दररोज कंडोमची साधारण तीन-चार पाकिटं विकली जायची. मात्र आता विक्री कित्येक पटींनी वाढली आहे. त्यामुळे दुकानातून कंडोम गायब झाली आहेत.
याआधी टूथपेस्ट आणि शाईचा वापर नशा करण्यासाठी केला जात होता. त्यामुळे नायजेरियामध्ये टूथपेस्ट आणि शाईच्या विक्रीत सहापटीनं वाढ झाली. आता दुर्गापूरमध्ये असाच प्रकार घडत आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. तरुणांमधील मोठ्या वर्गाला या नशेची आहारी जाण्याची भीती वर्तवली जात आहे. याबद्दल प्रशासनानं अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Marathi News from Maharashtra Times, TIL Network