हे वाचा-आशय कुलकर्णीशी लग्न करणारी मुलगी ठरणार नशीबवान, का ते इथे वाचा
या न्यूड फोटोशूटमध्ये अंकित भाटिया ६ पॅक अॅब्स फ्लॉंट करताना दिसतोय. त्याचा फिटनेस आणि टोन्ड बॉडी पाहून अनेकजण घायाळ झाले होते. बॉलिवूड अभिनेत्यांनाही मागे टाकेल असा त्याचा लूक त्यावेळीही व्हायरल झाला होता. या फोटोशूटमध्ये त्याच्यासह टीना दत्ताही होती. तिचाही बोल्ड लूक या फोटोत पाहायला मिळाला आहे.

२०१८ मध्ये अंकित भाटिया आणि टीना दत्ता यांनी केलेले फोटोशूट
अंकितला मिळाल्या संमिश्र प्रतिक्रिया
अंकित भाटियाच्या या फोटोशूटवर लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या होत्या. काही लोकांना त्याची ही स्टाइल खूप आवडली तर अनेकांनी त्याला ट्रोलही केले होते. रणवीर सिंगसोबतही असेच घडले. त्याच्या फोटोशूटवरही संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या आहेत.
दीपिकानेही दिलीये प्रतिक्रिया
रणवीरच्या फोटोंवर अनेक प्रतिक्रिया येत असल्या तरी त्याची पत्नी दीपिका पादुकोणचे याबाबत काय म्हणणे आहे हे लोकांना जाणून घ्यायचे होते. दरम्यान अशी माहिती समोर आली आहे की हे फोटो व्हायरल होण्यापूर्वीच दीपिकाने ते पाहिले होते. या संपूर्ण शूटची संकल्पनाही तिला आवडली होती.
रणवीर सिंग आणि अंकित भाटिया या दोघांव्यतिरक्त आणखीही काही हे सेलिब्रिटी आहेत ते विविध कारणांसाठी केलेल्या फोटोशूटमध्ये न्यूड झाले होते. काही चित्रपटासाठी तर काही फोटोशूटसाठी.
हे वाचा-त्यांच्यासाठी नाना पाटेकर ‘छोटा ॲक्टर’; काजोल-श्रीदेवीनेही दिलेला फिल्मसाठी नकार
हे सेलेब्स झाले आहेतत न्यूड
‘पीके’मध्ये आमिर खानचे न्यूड पोस्टर समोर आले होते. मिलिंद सोमणचे ते वादग्रस्त फोटोशूट न विसरता येण्यासारखे आहे. ज्यामध्ये त्याच्याभोवती साप लपेटलेला होता. त्याने त्याची एक्स गर्लफ्रेंड मधू सप्रेसह हे फोटोशूट केले होते. याशिवाय काही महिन्यांपूर्वी त्याने गोव्यातील एक फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये त्याचा न्यूड अंदाज पाहायला मिळाला होता. तर विजय देवरकोंडाने त्याच्या आगामी ‘लायगर’ या सिनेमासाठी न्यूड फोटोशूट केले आहे.