राज ठाकरे म्हणाले, “शिवसेना फुटल्यानंतर देवेंद्र फडणवीस माझ्याकडे आले होते. त्यावेळी मी त्यांना म्हटलं, की उगीच आजच्या परिस्थितीचं फुकटचं श्रेय घेऊ नका, असं मी त्यांना म्हणताच, ते मोठ्याने हसायला लागले. म्हटलं, जी गोष्ट आज घडलेली आहे, ती गोष्ट ना तुम्ही घडवली, ती गोष्ट ना अमित शहांनी घडवली ना भाजपने घडवली, ना अजून कुणी घडवली, याचं श्रेय म्हटलं उद्धव ठाकरेंनाच द्यावं लागेल…”

‘ती’ गोष्ट ना तुम्ही घडवली, ना अमित शहांनी, अन् फडणवीस हसायला लागले
देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्यानंतर राज ठाकरे यांनी त्यांना भावनिक पत्र लिहिलं होतं. त्यानंतर विधानसभेत बोलताना मी राज ठाकरेंना भेटायला जाईन, असं फडणवीसांनी सांगितलं. त्यानंतर फडणवीस राज ठाकरेंना भेटायला गेले. त्यावेळी घडलेला एक प्रसंग राज ठाकरेंनी आजच्या मुलाखतीत सांगितला. “माझ्याकडे देवेंद्र फडणवीस आले होते. त्यावेळी मी त्यांना म्हटलं, की उगीच आजच्या परिस्थितीचं फुकटचं श्रेय घेऊ नका, असं मी त्यांना म्हणताच, ते मोठ्याने हसायला लागले. म्हटलं, जी गोष्ट आज घडलेली आहे, ती गोष्ट ना तुम्ही घडवली, ती गोष्ट ना अमित शहांनी घडवली ना भाजपने घडवली, ना अजून कुणी घडवली, याचं श्रेय म्हटलं उद्धव ठाकरेंनाच द्यावं लागेल…”
राज ठाकरे म्हणाले, “कारण शिवसेनेत हे एकदा घडलेलं नाहीये. आत्तापण जे काही आरोप प्रत्यारोप झाले, ज्यांनी संजय राऊतांना झोडपून काढलं. संजय राऊतांचा काय संबंध…. रोज सकाळी येऊन टीव्हीवर काहीबाही बोलायचं, तो अॅरोगन्स.. ती भाषा.. वगैरे वगैरे ज्यांनी माणसं इरिटेड होऊ शकतात. जी झाली पण… नको ते रोजरोजचं बोलणं… ते तेवढ्यापर्यंत होतं. त्याने काही आमदार फुटत नसतात. मी ही बाहेर पडलो तेव्हा कारणं तीच होती. आज आमदार फुटतात कारणं तीच आहेत. मध्यंतरी शिवसेनेला काही लोकं सोडून गेली. कारणं तीच होती. मी बाळासहेबांना काही गोष्टी सांगत होतो. पण ठीक आहे असो…”
राज ठाकरेंनी करुन दिली, युतीचा फॉर्म्युला ठरल्याची आठवण!
चार भिंतीच्या आत मुख्यमंत्रिपद अडीच-अडीच वर्ष वाटून घेण्याचं कमिटमेंट झाल्याचं सांगता, मग पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जाहीर भाषणात देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार, हे सांगितलं, त्यावर आक्षेप का नाही घेतला? असा रोखठोक राज ठाकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. ज्याचे आमदार जास्त, त्या पक्षाचा मुख्यमंत्री, हा युतीचा फॉर्म्युला ठरल्याची आठवण राज ठाकरेंनी करुन दिली.