लखनऊच्या कॅफेबाहेर शुक्रवारी रात्री मारहाण झाली. तरूणीने तरूणाला चोप दिला आहे. तिथं असलेल्या एका व्यक्तीने हा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद केलं आणि सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यानंतर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. @sengarlive या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओत पाहू शकता कॅफेबाहेर बरेच लोक जमलेले दिसत आहेत. तिथं दोन तरूणी रागात दिसत आहेत. त्यांच्यासमोर एक तरूणा आहे. एक तरूणी दुसऱ्या तरूणीला त्या तरूणापासून दूर खेचताना दिसत आहे. पण ती तरूणी काही ऐकायला तयार नाही.
ती पुन्हा मागे येते आणि त्या तरुणाला कानशिलात लगावते. त्यानंतर तिथं जवळच झाडांच्या कुंड्या ठेवलेल्या आहेत. तिथल्या एकएक कुंड्या उचलून त्या तरुणावर डोक्यावर फोडते. तिच्यासोबत असलेली दुसरी तरुणी तिला अडवण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर सुरक्षारक्षकासह आणखी एक-दोन लोकही मध्यस्थी करायला येतात. कसंबसं करून ते त्या तरुणाची त्या तरुणीच्या तावडीतून सुटका करतात. तरुणीला कॅफेच्या आत नेलं जातं आणि तरुणाला बाहेर काढलं जातं.
मिळालेल्या माहितीनुसार, हे तरुण-तरुणी कॅफेमध्ये पार्टी करायला गेले. तिथं दोघांनीही ड्रिंक घेतली आणि त्यानंतर कोणत्या तरी कारणावरून त्यांच्यात वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की तो मारहाणीपर्यंत पोहोचला. लढाई करत दोघंही कॅफेच्या बाहेर आले. टाइम्स नाऊ हिंदीच्या वृत्तानुसार पोलिसांच्या मते, त्यांना याबाबत काहीही माहिती मिळालेली नाही. व्हिडीओ पाहून त्यानुसार कारवाई केली जाईल.