महेश मांजरेकर यांना २०२१ मध्ये कॅन्सर झाल्याचं निदान झालं होतं. त्यानंतर त्यांनी अत्यंत धीरानं या कॅन्सरशी लढा दिला आणि त्यातून मुक्त झाले. त्यांनी कॅन्सरविरोधात जो लढा दिला तो अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. अभिनेत्री आणि बिग बॉसच्या दुसऱ्या सिझनमधील स्पर्धक नेहा शितोळे हिनं महेश मांजरेकर यांच्याबरोबरचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. महेश यांचा तो फोटो पाहून अनेकांना सुखद धक्का बसला. त्यानंतर त्यांनी मांजरेकरांचे भरभरून कौतुक करायला सुरुवात केली.

नेहा शितोळेसह महेश मांंजरेकर
हे वाचा-‘मला मोठा धक्का बसलाय..’, दीपेश भान यांच्या निधनाचं वृत्त ऐकताच नेहा पेंडसे सुन्न!
अनेक नेटकऱ्यांनी महेश यांच्यात झालेल्या बदलाचं कौतुक करत त्यांना दाद दिली आहे. तसंच यावेळी अनेक नेटकऱ्यांनी बिग बॉसच्या चौथ्या सिझनची ते उत्सुकतेनं वाट बघत असल्याचं सांगितलं आहे. एका चाहत्यानं कॉमेन्टमध्ये लिहिलं की, ‘सर कसले सॉल्लिड दिसत आहात. आता बिग बॉस मराठी ४ मध्ये येणार धम्माल. सर तुमच्यापासून आम्ही प्रेरणा मिळत आहे. देखणे दिसत आहात…’

महेश मांजरेकरांना पाहून चाहते आनंदित
आणखी एका युजरनं लिहिलं आहे की, ‘बिग बॉस मराठीचा सूत्रसंचालक आमचा वाघ परत आलाय’ अनेक नेटकऱ्यांनी महेश मांजरेकर यांचा परत एकदा त्यांच्या जुन्या फॉर्ममध्ये पाहून आनंद व्यक्त केला आहे. एका युजरनं लिहिलं आहे की, ‘तुम्हाला परत या रूपात पाहून आनंद होत आहे. तुमचा प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे. लवकरच तुम्ही बिग बॉस मराठीमध्ये दिसाल. आम्ही आतुरतेनं वाट बघत आहोत.’ आणखी एका युजरनं महेश मांजरेकर यांचं बदलेलं रूप पाहून कॉमेन्टमध्ये एक शायरी पोस्ट केली आहे. त्यानं लिहिलं आहे की, ‘ ठोकर खा कर गिरना फिर खुद को खुद ही संभालना फिर दोबारा से चलना यही संघर्ष है यही जीवन का सत्य है…’
हे वाचा-त्यांच्यासाठी नाना पाटेकर ‘छोटा ॲक्टर’; काजोल-श्रीदेवीनेही दिलेला फिल्मसाठी नकार
बिग बॉस मराठी ३ चा सिझन सुरू होण्याआधीच महेश मांजरेकर यांना मूत्राशयाचा कॅन्सर झाल्याचं निदान झालं होतं. त्यातून बरे होत त्यांनी या कार्यक्रमासाठी प्रोमो शूट केलं त्यावेळी ऑपरेशन होऊन काहीच दिवस उलटले होते. वेदना होत असूनही महेश यांनी चेहऱ्यावर त्या न दाखवता प्रोमो शूट केले आणि त्यानंतर कार्यक्रमाचं सूत्रसंचालनही केलं होतं.