मुंबई : “चांगल्या काळात संपत्ती गोळा करायची आणि वाईट काळ सुरु की बाळासाहेबांच्या नावावर सिंपथी (सहानुभूती) मिळवायची, असले यांचे उद्योग… आज बाळासाहेब हयात तर शिवसेनेची अशी अवस्था झाली नसती. मी सगळ्या महाराष्ट्रापेक्षा उद्धव ठाकरेंना जास्त ओळखतो.. तो माणूस विश्वास ठेवण्याजोगा नाही. मी याअगोदरही तुम्हाला त्याची उदाहरणं दिली आहेत”, अशी परखड मतं व्यक्त करत असतानाच, “उद्धव ठाकरेंना कार्याध्यक्ष करुन पश्चाताप होतो का, असा प्रश्न विचारल्यावर मात्र, नाही.. मला पश्चाताप वगैरे काही होत नाही. जो माणूस आपल्या नशीबालाच कर्तृत्व समजतो, त्याची प्रगती खुंटते. आज तेच झालंय…”, असं रोखठोक उत्तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलं.

शिवसेनेच्या अभूतपूर्व बंडानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी झी २४ तास वृत्तवाहिनीला सडेतोड मुलाखत दिली. या मुलाखतीत राज ठाकरे यांनी शिवसेनेचं वर्तमान, भूतकाळ आणि भविष्याकाळावर भाष्य केलं. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर शिवसेनेतील लोक फक्त सहानुभूती गोळा करतात. पण खरं तर आज जी शिवसेनेवर परिस्थिती ओढावलीये, बाळासाहेब असते तर आजची परिस्थिती ओढावली नसती. शिवसेना हा पक्ष किंवा संस्था म्हणून पाहू नका. मुळात एका विचाराने बांधली गेलेली माणसं होती. बाळासाहेबांच्या विचारांवर ती माणसं चालत होती. बाळासाहेब होते, तोपर्यंत विचार होते. ते गेले, विचारही गेले, असं राज म्हणाले.

एकनाथ शिंदेंचे ४० आमदार मनसेत विलीन झाले तर..? राज ठाकरेंचं ‘मनसे’ उत्तर
शिवसेनाप्रमुख होणं हे माझ्या मनात कधीही आलं नाही

राज ठाकरे म्हणाले, “असुरक्षित माणसं कधी प्रगती करु शकत नाही. ते कधी त्याच्या खांद्यावर, कधी ह्याच्या खांद्यावर प्रवास करत असतात. पण एकदा का कुणी खाली उतरवलं की त्यांची जागा त्यांना कळते. महाबळेश्वरच्या अधिवेशनात उद्धव ठाकरेंना कार्याध्यक्ष करण्याचा प्रस्ताव जरी माझा होता, तरी मी आज पस्तावत नाही. शिवसेना ही बाळासाहेबांची होती, सेना म्हणजे बाळासाहेबांचं अपत्य आहे. त्या संपूर्ण काळात बाळासाहेबांच्या मनात काय चालू होतं, हे मला जाणवत होतं. राजकारणात ठराविक गोष्टी सांगितलेल्या लोकांना पटत नाहीत. पण तेव्हाही शिवसेनेचं प्रमुख व्हावं, शिवसेना अध्यक्ष व्हावं, असं माझ्या मनात कधीच नव्हतं. दरम्यान मी बाळासाहेबांना अनेक पत्र लिहिलं आणि त्यातून एकच प्रश्न विचारायचो, माझा जॉब काय….?”

शिवसेना फुटली, फडणवीसांना म्हटलं, फुकटचं श्रेय घेऊ नका, ते श्रेय उद्धव ठाकरेंनाच : राज ठाकरे
उद्धव ठाकरे विश्वास ठेवण्यायोग्य माणूस नाही

उद्धव ठाकरे विश्वास ठेवण्यासारखे नाहीत, ते बोलतात वेगळं आणि करतात वेगळं, अशा भावना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केल्या. उद्धव ठाकरे मनसेला युतीसाठी टाळी देणार असल्याच्या चर्चांबाबत विचारलं असता, राज ठाकरेंनी उत्तर दिलं. उद्धव ठाकरे हॉस्पिटलमध्ये असताना भेटायला गेलो, हा भावना आणि आजारपणाचा विषय म्हणून ठीक आहे, पण त्यांच्यावर विश्वास ठेवू शकत नाही, असं राज ठाकरे म्हणाले.

तो माणूस विश्वास ठेवण्यासारखा नाही, उद्धव ‘दादू’बद्दल राज ठाकरेंच्या कोरड्या भावना
शिवसेनेच्या बंडखोरांना मनसेत एन्ट्री देणार का? राज ठाकरे म्हणाले…

शिवसेनेच्या ४० आमदारांचा पाठिंबा असलेल्या एकनाथ शिंदेंनी पक्षावरच दावा सांगितला आहे. त्यासाठी पक्षात उभी फूट असल्याचं शिंदे यांना सिद्ध करावं लागेल. त्यात त्यांना अपयश आल्यास त्यांच्यापुढे दुसऱ्या पक्षात विलीन होण्याचा पर्याय असेल. शिंदे गट मनसेमध्ये विलीन होईल अशी चर्चा मध्यंतरी सुरू होती. त्यावर राज यांनी भाष्य केलं. शिंदे गटाकडून तसा प्रस्ताव आल्यास नक्की विचार करू, असं ठाकरे म्हणाले. चाळीस आमदारांचं विलिनीकरण हा तांत्रिक मुद्दा आहे. अनेक वर्तमानपत्रांमध्ये मी हा विषय वाचला. त्या आमदारांकडून विलिनीकरणाचा प्रस्ताव मी नक्कीच विचार करेन, असं राज यांनी म्हटलं. इतके आमदार पक्षात आले तर मनसे कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष होईल असं वाटतं का? असा प्रश्न राज यांना विचारण्यात आला. त्यावर माझ्यासाठी आधी मनसैनिक. बाकीचे नंतर, असं उत्तर राज यांनी दिलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here