Serious allegations against Gulabrao Patil : शिंदे गटात सहभागी झालात, तर शहराच्या विकासकामांसाठी निधी देवू, अन्यथा विकासकामांमध्ये अडचणी निर्माण केल्या जातील, या शब्दात महापौर जयश्री महाजन यांना शिंदे गटात सहभागी झालेल्या पदाधिकाऱ्यांकडून धमकी देण्यात आल्याचे त्या म्हणाल्या. मात्र याला मी बळी पडणार नाही, मी निष्ठावंत शिवसैनिक आहे, जनतेचा शिवसैनिक म्हणून माझ्यावर जो विश्वास आहे, त्याला मी तडा जावू देणार नाही, असे महापौर जयश्री महाजन यांनी स्पष्ट केले आहे.

जळगाव जिल्ह्यातील माजी मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्यासह पाच आमदार हे शिंदे गटात सहभागी झाले. या आमदारांच्या पाठोपाठ शिवसेनेचे तसेच युवासेनेचे पदाधिकारी मोठ्या शिंदे गटात सहभागी झाले आहेत. जळगाव महापालिकेच्या जयश्री महाजन यांना एकनाथ शिंदे गटात सहभागी होण्यासाठी धमकी देण्यात आली असल्याचे महाजन यांनी म्हटले आहे. शिंदे गटात सहभागी झालात, तर शहराच्या विकासकामांसाठी निधी देवू, अन्यथा विकासकामांमध्ये अडचणी निर्माण केल्या जातील, या शब्दात महापौर जयश्री महाजन यांना शिंदे गटात सहभागी झालेल्या पदाधिकाऱ्यांकडून धमकी देण्यात आल्याचे त्या म्हणाल्या. मात्र याला मी बळी पडणार नाही, मी निष्ठावंत शिवसैनिक आहे, जनतेचा शिवसैनिक म्हणून माझ्यावर जो विश्वास आहे, त्याला मी तडा जावू देणार नाही, असे महापौर जयश्री महाजन यांनी स्पष्ट केले आहे.
क्लिक करा आणि वाचा- राज्यातील शिंदे गटाचा पहिला सरपंच जळगावात, पण ‘ठाकरें’ची कॉलर टाईट
जळगाव तालुक्यातील चिंचोली येथील युवासेनेचे विधानसभा क्षेत्र अधिकारी विजय लाड यांच्यासह कार्यकर्त्यांना शिंदे गटात सहभागी होण्यासाठी शिंदे गटात सहभागी झालेले माजी मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून निधीची ऑफर देण्यात आली आहे, असा खळबळजनक आरोप लाड यांनी केला आहे. गावात दहा लाखांची कामे देवून, दोन कोटींचा निधी देवू, शिंदे गटात सहभागी व्हावे, शिवसेनेचे आता भवितव्य नाही, अशा प्रकारे सांगण्यात येवून शिंदे गटात येण्याच आवाहन केलं जात आहे, असे लाड यांनी सांगितले. मात्र ही ऑफर धुडकावून लावत शिवसैनिकांनी आम्ही कायम उध्दव ठाकरेंच्या पाठीशी असल्याचे लाड यांनी म्हटले आहे.
क्लिक करा आणि वाचा- गुलाबराव पाटलांचा झटका, आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसाला दिलेली ती रुग्णवाहिका घेतली परत
शिंदे सहभागी आमदारांकडून घाणेरडे राजकारण केले जात असल्याचे सांगत संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी कडक शब्दात टीका केलीय. कुठल्याही शिवसैनिकाला धमकी देवू नये, जो धमकी देईन, त्याला जनता त्यांची जागा दाखवेल, मातीत झोपविल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दांत संजय सावंत यांनी शिंदे गटाच्या आमदारांना इशारा दिला आहे.
क्लिक करा आणि वाचा- पिंपळाच्या झाडाला पाणी टाकायला गेला, अन् त्यानंतर जे दिसलं ते धक्कादायक…
सत्तांतरानंतर शिंदे गट जळगाव जिल्ह्यात वर्चस्व सिध्द करण्यासाठी मैदानात उतरला आहे. तर दुसरीकडे उध्दव ठाकरे यांच्या समर्थनार्थ संघटना बळकट करण्यासाठी शिवसेनेही कंबर कसल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे आगामी काळात जिल्ह्यात शिवसेनेतून बाहेर पडलेला शिंदे गट व उध्दव ठाकरे यांची शिवसेना यांच्यात प्रतिष्ठेची लढाई पहायला मिळणार आहे.