Amol Mitkari News : विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी आज बारामती दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी शिंदे गटावर निशाणा साधला. ते म्हणाले की, दोन मंत्र्यांचं हे सरकार लवकरच बरखास्त झालेलं दिसेल आणि मध्यावधी निवडणुका लागल्या तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची चांगली कामगिरी दिसेल.

 

हायलाइट्स:

  • दोन मंत्र्यांचं हे सरकार लवकरच बरखास्त होईल
  • भविष्यात अजित पवार हेच मुख्यमंत्री होणार
  • अमोल मिटकरी आज बारामती दौऱ्यावर होते
पुणे : विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी आज बारामती दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी शिंदे गटावर निशाणा साधला. ते म्हणाले की, दोन मंत्र्यांचं असणारं हे सरकार लवकरच बरखास्त झालेलं दिसेल आणि मध्यावधी निवडणुका लागल्या तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची चांगली कामगिरी दिसेल. असा विश्वास त्यांनी यावेळी दर्शवला. ते पत्रकारांशी बोलत होते.

भविष्यात अजित पवार हेच मुख्यमंत्री होणार असल्याचं मिटकरी यांनी यावेळी सांगितलं. सध्या राज्यात एका गटाकडून ऑफर सुरू आहे. या गटाचे अध्यक्ष व्हा मर्सडीज घ्या, दोन लाख रुपये महिना घ्या, दोन कोटी रोख घ्या, असं म्हणत मिटकरी यांनी सध्या सुरू असलेल्या राजकारणातील घोडेबाजारासंबंधी भाष्य करत शिंदे सरकारवर जोरदार टीका केली.

शिंदे गटात सहभागी होण्यासाठी दबाव, धमक्या?; गुलाबराव पाटलांवर खळबळजनक आरोप
माजी उपमुख्यमंत्री व तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार हे आमदारांना निधी देत नसल्याचा आरोप करत काही आमदार शिंदे गटात सामील झाले. भाजपच्या एका आमदाराने सांगावे की निधी दिला नाही. ‘काय झाडी.. काय डोंगर.. काय हाटील..’ असे म्हणणाऱ्या आमदार शहाजी पाटील यांना तर ३८० कोटीहून अधिक निधी दिला. तरी आरोप करण्यात आले की, आमदारांना निधी न देता अख्खा निधी बारामतीकडे पळवला. असा खुलासा करत मिटकरी यांनी निधी दिला नाही असा आरोप करणाऱ्यांवर निशाणा साधला.

एकनाथ शिंदेंचे ४० आमदार मनसेत विलीन झाले तर..? राज ठाकरेंचं ‘मनसे’ उत्तर

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : amol mitkari criticizes shinde government ajit pawar will be the chief minister
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here